शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी पात्रातच आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:23 IST

Ulhas river Kalyan : लाखो लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीने नदी पात्रात संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे.

कल्याण - लाखो लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीने नदी पात्रात संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. जोर्पयत प्रदूषण रोखले जात नाही. तोर्पयत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा निकम यांनी दिला आहे.नदी पात्र मोहने येथे निकम यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांना माजी नगरसेवक उमेश बोरगावकर आणि कैलास शिंदे यांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर उल्हास नदी बचाव कृती समितीचे रविंद्र लिंगायत, वालधूनी जलबिरादरीचे शशिकांत दायमा यांनीही पाठिंबा दिला आहे. निकम यांनी सांगितले की, राजमाचीच्या डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. ही नदी कजर्तपासून प्रदूषित होते. मात्र मोहने बंधारा येथे ती जास्त प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात म्हारळ, गाळेगाव आणि म्हारळ येथील सांडपाण्याचे नाले येऊन मिळतात. या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात जलपर्णी उगविली आहे. दरवर्षी नदी पात्राच्या पाण्यात जलपर्णी उगविते. जलपर्णी मोठय़ा प्रमाणात पाणी शोषते. जलपर्णी काढण्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, लघू पाटबंधारे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही एक ठोस पावले उचलली जात नाहीत. नदीमधील जैव विविधता प्रदूषणामुळे धोक्यात आली आहे. या नदीच्या पाण्यावर ४८ लाख लोकांची तहान भागते. २०१५ सालापासून निकम हे उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत आहेत. २०१६ मध्ये त्यांनी १२ दिवस नदी पात्रात बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे उपोषण सोडविले होते. त्यानंतर पुन्हा ७ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे उपोषण सोडविले होते. आत्ता जोर्पयत ठोस उपाययोजना केली जात नाही तोर्पयत आजपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे निकम यांनी सांगितले. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने आंदोलनाच्या ठिकाणी बॅनर लावला आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मोहने मोहने नाला येथे बंधारा आणि उदंचन केंद्र बांधून सांडपाणी आंबिवली मलशुद्धीकरण केंद्रात नेण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :kalyanकल्याणulhasnagarउल्हासनगर