शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या झटक्यानंतर भाजपसह महायुतीचा शिंदेसेनेने धरला आग्रह; पदाधिकाऱ्यांना दिले आदेश; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

By सदानंद नाईक | Updated: December 23, 2025 10:20 IST

भाजपसह महायुती करून उल्हासनगरात भगवा फडकवा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नेत्यांना दिले.

- सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शेजारील अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद गमवावे लागल्यानंतर उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपसह सर्व पक्षांची महायुती करण्याचा आग्रह शिंदेसेनेने धरला आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत केवळ युती करून चालणार नाही, तर भाजपसह महायुती करून उल्हासनगरात भगवा फडकवा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नेत्यांना दिले. रिजन्सी मैदानात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आपण सर्व एकत्र आलो तर महाविकास आघाडीचा भोपळा फुटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

मेळाव्याला खा. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, पक्षनेते चंद्रकांत बोडारे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, उल्हासनगरच्या विकासासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नगरपालिका निवडणुकीत जनतेने कोणती शिवसेना असली व नकली आहे, हे दाखवून दिले.

महायुतीचे समीकरण आणि स्थानिक पेचउल्हासनगरात शिंदेसेनेने ओमी कलानी टीम आणि स्थानिक साई पक्षासोबत जवळीक साधली. मागील वेळी कलानी व साई पक्षाच्या मदतीने महापौर बसवणाऱ्या भाजपला शह देण्याकरिता शिंदेसेनेने यावेळी त्या दोन्ही पक्षांसोबत युती केली. मात्र, त्यानंतर युतीबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली. युतीमध्ये शिंदेसेनेने आपल्या वाटणीच्या जागांतून ओमी कलानी व साई पक्षाला जागा सोडण्याची मागणी भाजपने केली. शेजारील अंबरनाथमध्ये निवडणुकीत नगराध्यक्षपद गमावल्यावर आता शिंदेसेनेने भाजपसह महायुतीचा आग्रह धरला.

भाजपचा ओमी कलानींना विरोध, युतीसाठी अटशिंदेसेनेने ओमी कलानी यांच्यासोबत असलेली युती तोडली किंवा कलानी यांची माजी नगरसेवकांची टीम शिंदेसेनेत विलीन झाली तरच त्या पक्षासोबत युती करू, अशी अट भाजपने घातली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Insists on Alliance After Ambernath Setback; BJP's Role?

Web Summary : Following Ambernath's loss, Shinde Sena pushes for a grand alliance with BJP in Ulhasnagar. Eknath Shinde urged local leaders to unite. BJP demands Shinde Sena cut ties with Omi Kalani for alliance talks.
टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Shiv Senaशिवसेना