शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अदानी समूहाला एनआरसी कंपनीच्या जागेचा अद्याप संपूर्ण ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 15:28 IST

जमीन अधिग्रहीत करण्यावर 200 कोटीचा खर्च; अदानी समूह सूत्रांची माहिती

कल्याण-आंबिवली नजीक असलेल्या एनआरसी कंपनीची 440 एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या जागेवर लॉजिस्टीक पार्क उभारला जाणार आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहीत केली जात आहे. मात्र अदानी समूहाला कंपनीच्या जागेचा संपूर्ण ताबा अद्याप मिळविता आलेला नाही. कंपनीची जागा अधिग्रहीत करण्यासाठी अदानी समूहाने आत्तार्पयत 200 कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांनी दिली आहे.  एनआरसी कंपनी सुरु होती तेव्हा कामगारांना राहण्यासाठी क्वार्टर्स दिले होते. क्वार्टर्स हे कामगारांच्या ताब्यात आहेत. अदानी समूहाने जमिनीची कायदेशीर खरेदी केली आहे.एनसीएलटीच्या आदेशानुसार कामगारांना 68 कोटी  देण्याची तयारी दर्शविली होती. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची तयारी अदानी समूहाने दाखविली होती. मात्र ही मागणी कामगारांना मान्य नाही. एनआरसी कंपनीच्या 45 कामगारांनी औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागितली होती. क्वार्टर्सचा ताबा कामगारांना देण्यात यावा. मे 2021 मध्ये न्यायालयाने अंतरिम आदेश देत क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडेच ठेवण्यास परवानगी दिली होती. हा आदेश चुकीचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने 17 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडे ठेवण्यास दिलेली परवानगी रद्दबातल ठरविली. तसेच हा खटला त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा खटला आयबीसीच्या 2016 नुसारच्या कायद्यांतर्गत येतो. त्यामुळे अदानी समूहाने क्वार्टर्समध्ये राहणा:या कामगारांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देणो हे बेकायदेशीर ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. न्यायालयाने कामगार वास्तव्याची परवानगी देण्याचा निर्णय रद्दबातल ठरविला नसून खटलाच फेटाळून लावला असल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रंनी दिली आहे. दरम्यान एनसीएलटी दिल्ली येथे कामगार अपिलात गेले आहेत. त्यांचे अपिल न्यायप्रविष्ट आहे. औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयामुळे दिल्ली येथील एनसीएलटीकडे पुढील सुनावणी दरम्यान काय निर्णय घेतला जाऊ शकतो याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर एनआरसी कंपनीच्या आवारातील क्वार्टर्स जीर्ण झालेले आहेत. धोकादायक आहे. ते तोडण्यासाठी नोटिसा दिलेल्या आहेत. ही घरे तोडण्यास कामगारांचा विरोध आहे. या धोकादायक इमारतीत वास्तव्य करणा:यांच्या जिवितास धोका होऊ शकतो असे एनआरसी कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Adaniअदानी