शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत दुकानांवर कारवाई, दोन दुकान सील; उर्वरित दुकानांकडून दंड वसूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 18:01 IST

CoronaVirus : सोमवार ते शुक्रवारपर्यत दुपारी चारनंतर आणि शनिवार व रविवारी संपूर्ण दिवसभर दुकाने बंद असावेत, असे निर्देश आहेत.

कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी नियम उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर  अधिक कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानूसार डोंबिवलीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दोन दुकानं सील करण्यात आली, तर अन्य सहा दुकानदारांकडून एकूण 45 हजार  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

सोमवार ते शुक्रवारपर्यत दुपारी चारनंतर आणि शनिवार व रविवारी संपूर्ण दिवसभर दुकाने बंद असावेत, असे निर्देश आहेत. डोंबिवली पूर्वेकडील "फ" प्रभाग क्षेत्राच्या अखत्यारीत येणाऱ्या काही दुकानांनी  नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. कैलास लस्सी आणि मिठाईवाले या दुकानदाराने दुसऱ्यांदा नियमांचे भंग केल्याने त्यांच्याकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पहिल्यांदाही या दुकानावर कारवाई करत 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. तर तिसऱ्यांदा  नियम मोडल्यास  दुकान सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

याच दुकानाच्या बाजूला असलेल्या एजे स्वीट दुकानावरही पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. दोन दुकांनांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये तीन दुकानांकडून  प्रत्येकी 5 हजार रुपये असे एकूण 45 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे फ प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी सांगितले. तर दोन दुकानं सील करण्यात आल्याचेही  ते म्हणाले. 

टॅग्स :kalyanकल्याणcorona virusकोरोना वायरस बातम्या