शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाकुचा धाक दाखवून जबरीचोरी करून फरार झालेले जेरबंद; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

By प्रशांत माने | Updated: November 16, 2023 14:37 IST

याउपरही त्याने मनाई केलेल्या हद्दीत दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील प्रमुख आरोपी अक्षय उर्फ सोनू किशोर दाते ला तडीपार केले आहे. याउपरही त्याने मनाई केलेल्या हद्दीत दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे.

आता मार्केट खुप बदललय, पहिल्या सारखी दुनिया राहिली नाही, तु लहानपणी पाहिलेला सोनू आता तो सोनू नाही आता मी भाई आहे, तु मला काळा का बोलला असे बोलून हर्षद सरवदे याला अक्षयने आणि अन्य दोघा साथीदारांनी मारहाण करीत त्याच्याकडील २ हजार ६०० रूपयांची रोकड चाकुचा धाक दाखवित चोरून नेली होती. हा प्रकार डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्लीतील राजु वडापाव दुकानाजवळ मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी स्थानिक रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखा करीत होती.

वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार अनुप कामत, बापुराव जाधव, पोलिस नाईक सचिन वानखेडे, दिपक महाजन, पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र लांडगे आदिंचे पथक तपासकामी नेमले होते. पोलिस नाईक वानखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरिक्षक राहुल मस्के यांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दत्तनगर येथील प्रगती कॉलेज जवळ सापळा लावून अक्षय दाते आणि त्याचा साथीदार रोहीत भालेराव या दोघांना जेरबंद केेले. दोघेही सराईत गुन्हेगार असून यातील अक्षय ला मुंबई, ठाणे, रायगड या जिल्हयातून हद्दपार केले गेले आहे अशी माहिती मस्के यांनी दिली. दरम्यान अन्य एक आरोपी अदयापही मिळून आलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी