शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

"आपले पाप लपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर आरोप"; शिंदे गटाकडून भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर

By मुरलीधर भवार | Updated: September 19, 2022 18:01 IST

कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात रस्त्यावरील खड्ड्यांवरून वादाची ठिणगी

कल्याण: रस्ते विकासाच्या निधीवरुन काल डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नगरविकासला लक्ष केले. त्यांचा प्रत्यक्ष टोला हा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच होता. त्यांच्या या टिकेची शिवसेनेच्या शिंदे गटाने गंभीर दखल घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आपले पाप लविण्यासाठी मुख्यमंत्र्यावर मंत्री चव्हाण हे आरोप करीत असल्याचे प्रतिउत्तर दिले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांवरुन कल्याण डोंबिवलीतील भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.

"यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडीच्या सरकार पूर्वी आमदार चव्हाण हे राज्यमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते विरोधी बाकावर बसून विरोधकाची भूमिका बजावित होते. त्यांनी गेल्या अडीच वर्षात तत्कालीन पालक आणि नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले. मात्र सत्ता बदलाच्या राजकारणात मंत्री चव्हाण हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून चव्हाण यांनी गुहाटीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास केला. त्याच वेळी त्यांनी शिंदे यांच्या कानात सांगायला हवे होते. कोणती कामे रखडली आणि कोणती झाली आहेत. आत्ता सत्ता शिंदे-फडणवीस यांची आली आहे. या सत्तेत ते मंत्री आहेत, हेच चव्हाण विसरले आहेत. १३ वर्षात चव्हाण यांच्यामुळेच कामे रखडली", असा दावा दीपेश म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या टिकेला उत्तर देताना केला.

"मंत्री चव्हाण हे वारंवार ४७२ कोटीची रस्ते विकासाची कामे मंजूर झाली होती. ती नामंजूर केल्याचा उल्लेख वारंवार करतात. त्यांनी ठामपणे सांगितले की, खरेच ही कामे मंजूर झाली होती. तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे असे म्हात्रे यांनी सांगितले. खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच डोंबिवलीतील रस्ते विकासकरीता ३७० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली आहे. याचा विसर चव्हाण यांना पडला आहे. त्यांच्या मतदार संघात दोन रस्ते येतात. या रस्त्याची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत. ठाकूर्लीला रेल्वे उड्डाणपूलाचे एका बाजूचे काम रखडलेले आहे. याला जबाबदार कोण असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. ७२ तासात रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले पाहिजेत असा मुद्दा चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. ही बाब त्यांची चांगली असली तरी ७२ तासात खड्डे बुजविण्याकरीता त्यांनी का पुढाकार घेतला नाही", असाही प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kalyanकल्याणShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा