शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"माझी केस संपवा, मला मोकळे करा" , आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली! कल्याण न्यायालयातील धक्कादायक घटना

By मुरलीधर भवार | Updated: December 21, 2024 19:52 IST

या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी ऐकण्याकरीता वकिलांनीही गर्दी केली होती.

कल्याण - कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. कल्याण पश्चिमेतील अजमेरा या हाय प्रोफाईल सोसायटीत एका मराठी तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याच्यासह ६ जणांना कल्याण जिल्हा सत्र हजर केले जाणार होते. हा हल्ला मराठी विरुद्ध हिंदी या भाषिक वादातून झाला असल्याने आरोपीला न्यायालयात हजर केले जात असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिसांनी न्यायालयात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी ऐकण्याकरीता वकिलांनीही गर्दी केली होती. हा सगळा प्रकार सुरु असताना दुसरीकडे एका न्यायाधीशांच्या न्याय दालनात आरोपी किरण भरम याने न्यायधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली. आरोपी भरम हा गेल्या चार वर्षापासून आधारवाडी कारागृहात न्यायिक बंदी आहे. त्याच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्येच्या प्रकरणात आरोप आहे. पोलिसांनी त्याला चार वर्षापूर्वी या प्रकरणात अटक केली. त्याची रवानगी न्यायालायने न्यायालयीन कोठडीत केली. तेव्हापासून तो आधारवाडी कारागृहात आहे. त्याला जामीन मिळालेला नाही.

आरोपी भरम याच्या प्रकरणाची आज न्यायालयीन तारीख होती. या तारखेच्या सुनावणीकरीता पोलिसांनी त्याला आरोपी भरम याला न्यायालयात हजर केले. त्यांच्या प्रकरणावर सुनावणी होऊन त्याला पुढील तारीख दिली गेली. न्यायधीशांनी आरोपी भरम याला घेऊन जाण्यास पोलिसांना सांगितले. त्याचवेळी आरोपी भरम हा जोरात बोलला की, माझी केस संपवा. मला मोकळे करा. हे त्याचे बोलून होत नाही. तोच त्याने त्याच्या पायातील चप्पल काढून न्यायधीशांच्या दिशेने भिरकावली. हा प्रकार पाहून उपस्थित पोलिस आणि वकिल यांना मोठा धक्का बसला. या घटनेची नोंद सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती.

टॅग्स :Courtन्यायालयkalyanकल्याण