शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

इमारत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुर्घटना; स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेकडे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:04 IST

तळ अधिक चार मजली इमारत २००१ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत ५० कुटुंबे राहत होती...

कल्याण : सप्तशृंगी धोकादायक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी मालकाने महापालिकेची परवानगी घेतली होती किंवा नाही, हे स्पष्ट नाही. दरम्यान, या इमारत दुरुरस्तीचे काम करणाऱ्यावर  रात्री उशिरा कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल  करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तळ अधिक चार मजली इमारत २००१ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत ५० कुटुंबे राहत होती. रहिवासी जयश्री क्षीरसागर यांनी सांगितले की, त्या दुसऱ्या मजल्यावर दोन वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहतात. आता त्यांच्यावर घराकरिता शोधाशोध करण्याची वेळी आली. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची नोटीस  सहायक आयुक्त सचिन तामखेडे यांनी बजावली होती.  ऑडिट केले की नाही, याची माहिती पालिकेकडे नाही.  

काम कशाच्या आधारे?पावसाळा आल्यावर ज्याप्रमाणे धोकादायक इमारतींना पालिका नोटिसा बजावते त्याप्रमाणे या इमारतीला नाेटीस बजावण्याची औपचारिकता पूर्ण केली होती. इमारत इतकी धोकादायक झाली होती, तर ती कोसळून जीवितहानी होण्याची पालिका वाट पाहत होते का, असा सवाल नागरिकांनी केला. इमारतीमधील दुरुस्तीच्या कामाला पालिकेने परवानगी दिली नव्हती; तर ते कशाच्या आधारे केले जात होते, असा प्रश्न उपस्थित झाला. 

इमारत पाडावी लागणार या इमारतीच्या अवतीभवती चाळी आहेत. इमारत पाडण्यासाठी पालिकेस मंगळवारी रात्री उशिरा कारवाई करणे शक्य नाही. मात्र, ही इमारत पाडावी लागणार आहे. या इमारतीच्या शेजारी असलेल्या चाळीतील नागरिकांना नूतन विद्यालय शाळेत सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. 

संक्रमण शिबिरे कुठे? कल्याण-डोंबिवलीत धोकादायक इमारती आहेत. पावसाळ्यात त्या कोसळण्याची भीती असते. अशा इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्यांचे स्थलांतर करण्यासाठी पालिकेकडे संक्रमण शिबिरे उभारलेली नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना शाळेत हलविण्याची वेळ येते. नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना त्यांना शाळेत न ठेवता त्यांच्या राहण्याची चांगल्या ठिकाणी व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी भरत सोनावणे यांनीही हीच मागणी केली.

इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस बजावली हाेती. इमारतीत स्लॅबची दुरुस्ती सुरू असताना ही घटना घडली. अभिनव गोयल, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका