शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली स्थानकात एसी ट्रेनला तुफान गर्दी, दरवाजे बंद न झाल्याने एसी लोकल रखडली, लटकणाऱ्यांना पोलिसांनी हाताला धरून उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:40 IST

Mumbai Suburban Railway: मुंब्रा येथील सोमवारच्या दुर्घटनेनंतर डोंबिवली व अन्य स्थानकावरील प्रवाशांनी मंगळवारी सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे बंद असलेल्या एसी लोकलमधून प्रवास करण्याला पसंती दिली. विशेष म्हणजे एसी लोकलमध्ये प्रवाशांची इतकी गर्दी झाली की, तब्बल १० ते १५ मिनिटे एसी लोकलचे दरवाजे बंदच होऊ शकले नाहीत

डोंबिवली  - मुंब्रा येथील सोमवारच्या दुर्घटनेनंतर डोंबिवली व अन्य स्थानकावरील प्रवाशांनी मंगळवारी सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे बंद असलेल्या एसी लोकलमधून प्रवास करण्याला पसंती दिली. विशेष म्हणजे एसी लोकलमध्ये प्रवाशांची इतकी गर्दी झाली की, तब्बल १० ते १५ मिनिटे एसी लोकलचे दरवाजे बंदच होऊ शकले नाहीत आणि तेवढा वेळ लोकल जागची हलली नाही. डोंबिवली स्थानकात घडलेली ही घटना दरवाजे बंद करण्याच्या फुशारक्या मारणाऱ्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.

डोंबिवली स्थानकात सकाळी ८:५९ ची एसी लोकल धिम्या फलाटावर आली. त्यात आधीच प्रचंड गर्दी होती. रोज त्याच गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना चढता आले नाही, इतकी तुफान गर्दी मंगळवारी या लोकलला झाली. जे गाडीत चढले ते दरवाजात अडकल्याने दरवाजे बंदच झाले नाहीत. अखेर रेेल्वे पोलिसांनी दरवाजाजवळ येऊन काही प्रवाशांना अक्षरश: हाताला धरून खाली उतरवले. त्यामुळे ही लोकल डोंबिवली स्थानकात जवळपास १० मिनिटे रखडली. दरवाजे बंद झाल्यानंतर अखेर ९:०९ मिनिटांनी ही लोकल मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.

मागील अनेक वर्षांपासून गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवा, एसी लोकलच्या फेऱ्या वाढवा, अशी मागणी प्रवाशी संघटनांकडून केली जात आहे. मात्र, रेल्वेकडून कधी प्रवासी संख्या कमी झाल्याचे, तर कधी कार्यालयाच्या वेळा बदलून गर्दी कमी करण्याचे सल्ले प्रवाशांना दिले गेले. मुंब्रा येथे सोमवारी प्रवाशांच्या पाठीवरील बॅगेचा धक्का लागून अपघात होऊन प्रवासी मरण पावल्याने पाठीवर मोठ्या सॅक घेऊन प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी गर्दीतून धोकादायक प्रवास टाळण्यासाठी मंगळवारी एसी लोकलला पसंती दिली. एसी लोकल दर एक तासाला सोडली जाते. त्यातही एसी लोकल अनेकदा अर्धा तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांना साध्या लोकलमधून लटकत प्रवास करतात. वाढत्या गर्दीमुळे एसी लोकलचा दरवाजा बंद न होणे, कधी दरवाजा उघडत नसल्याच्या तक्रारी प्रवाशाकडून केल्या जातात.

 

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेdombivaliडोंबिवलीAC localएसी लोकल