शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या लोकलमधून उतरताना ठाकुर्ली स्थानकात युवतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 07:04 IST

रविवारी दुपारी ३:२०च्या सुमारास दुर्घटना घडली. 

डोंबिवली : गाडीत चढल्यानंतर लोकल जलद असल्याचे समजताच घाईत धावत्या लोकलमधून उतरण्याच्या नादात ठाकुर्ली स्थानकातील प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रूळ यांच्यात सापडून युवतीचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३:२०च्या सुमारास दुर्घटना घडली. मेगाब्लॉक असल्याने नेमकी लोकल जलद आहे की धिम्या गतीची, याचा अंदाज न आल्याने युवती गाडीत चढली. मात्र, लोकलमध्ये चढल्यावर ती जलद असल्याचे समजताच तिने घाईत घेतलेला निर्णय तिच्या जिवावर बेतला. याबाबत डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी संगितले की, भाग्यश्री शंकर शिंदे (१७, रा. कृष्ण गोपाळ म्हात्रे चाळ, कुंभारखान पाडा, डोंबिवली पश्चिम) असे मृत मुलीचे नाव आहे. रविवारी ती मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी लोकल प्रवास करताना हा अपघात झाला.

कोपरपर्यंतचे आढळले तिकीट मुलीकडे कोपरपर्यंतचे तिकीट आढळले. रविवारी दुपारी अपघातात ती प्लॅटफॉर्म आणि रुळांत पडल्याने गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. तेव्हापासून लोहमार्ग पोलिस तिच्या वारसांचा शोध घेत होते. मात्र, सोमवारी सकाळपर्यंत त्याबाबत माहिती मिळाली नव्हती.

समाज माध्यमांवर संदेश, आईची पोलिसांत धाव  काहींनी अपघाताबाबत समाज माध्यमांवर संदेश व्हायरल करून मोबाइल नंबर दिला होता. अखेर सोमवारी दुपारी वारसांचा तपास लागला आणि त्यानंतर मृत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत ओळख पटवली. जलद लोकल असताना ती ठाकुर्लीत थांबली का? नेमकी मुलगी कोणत्या स्थानकात चढली? याबाबतची माहिती पोलिसांकडून मिळू शकली नाही.  सायंकाळी उशिरापर्यंत अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :localलोकलdombivaliडोंबिवली