शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची प्रसूती कल्याणच्या स्कायवॉकवरच; १०८ नंबरने दिला दगा, रिक्षा चालक धावले मदतीला

By मुरलीधर भवार | Updated: September 28, 2023 15:52 IST

तिचे नवजात बाळ सुखरुप असल्याची माहिती मदतीसाठी आलेल्या रिक्षा चालकांनी सांगितले. 

कल्याण-कल्याण पूर्वे भागातील रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवरुन गरोदर महिला तिच्या नातेवाईकासह रुग्णालयात जात असताना तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. तिच्या प्रसूतीसाठी रिक्षा चालक धावले. यावेळी रिक्षा चालकांनी १०८ नंबरवर कॉल  करुन रुग्णवाहिका मागविली असता त्यांच्याकडून रुग्णवाहिका निघाली असल्याचे सांगितले. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. तिची प्रसूती स्कायवॉकवरच झाली. अखेरीच खासजी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती व तिचे नवजात बाळ सुखरुप असल्याची माहिती मदतीसाठी आलेल्या रिक्षा चालकांनी सांगितले. 

कल्याण पूर्व भागात राहणारी गरोदर महिला सुरेखा शिंदे हिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने ती तिच्या नातेवाईकासोबत महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात निघाली होती. कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर पोहचली असता तिला प्रसूतीच्य ावेदना असहाय्य हाेऊ लागल्या. वेदनांची तीव्रता वाढली. तिच्या मदतीला रिक्षा चालक धावले. त्यांनी तिला रुग्णालयात नेण्याकरीता रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबरला  केला. त्यावेळी तिथून असे सांगण्यात आले की, आम्हाला रुग्णवाहिकेसाठी आणखीन दोन तीन जणांचे कॉल्सआले होते. आमची रुग्णवाहिका निघाली आहे असे सांगण्यात आले. मात्र त्याठिकाणी रुग्णवाहिकाच पोहचली नाही. अखेर महिलेची अवघड अवस्था पाहून रिक्षा चालकांनी प्रसंगावधान  राखत एका महिलेला पाचारण केले. तिची प्रसूती स्कायवॉकवरच झाली. १०८ नंबरवर कॉल करुनही रुग्णवाहिका पोहचली नसल्योन अखेरीस खाजगी रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. खाजगी रुग्णवाहिकेतून प्रसूती झालेल्या महिलेसह तिच्या नवजात बाळास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ते धावले तिच्या मदतीलारिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन गणेशोत्सव मंडपात उपस्थित असलेले उपाध्यक्ष विजय तावडे कार्यकर्ते संजय जगताप यांना प्रसंगावधान दाखविले. रुग्णवाहीकेने रुग्णालयात दाखल करण्यास बाबा शेख, चदंन शिवे,मनोज यादव,श्री जोशी, गणेश सुर्यवंशी, 'प्रेम बंगाली ह्या रिक्षा चालकांनी मदत केली .

काही दिवसापूर्वी गरदोर महिलेला प्रसूतीच्या वेदना स्कायवॉकवर सुरु झाल्यावर तिला हातगाडीवरुन महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले असता. त्याठिकाणी तिला प्रसूतीकरीता दाखल करुन न घेतल्याने तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली होती. त्यामुळे महापालिका रुग्णालयाची अनास्था उघड झाली होती. आत्ता पुन्हा एका महिलेची प्रसूती स्कायवॉककवर झाली. तिच्यासाठी १०८ नंबरवर रुग्णवाहिकेसाठी का’ल करुन रुग्णवाहिका आली नाही. ही बाब या घटनेतून उघड झाली आहे.