शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

डोंबिवलीतील तरुणाईचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर खास गीत

By सचिन सागरे | Updated: February 19, 2023 16:34 IST

गाणं तयार करणाऱ्या तरुणांनी फूड डिलिव्हरी केली अन् मिनरल वॉटरचा टेम्पो चालवून पैसे जमा केले.

सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: शिवाजी महाराज हे निव्वळ दैवत नसून अवघ्या मराठी जनांचे आदर्श आहेत. महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून डोंबिवलीतील काही तरुणांनी एकत्र येत पहिलं वहिलं गीत तयार केलं ते देखील महाराजांवर. विशेष म्हणजे, हे गाणं तयार करणाऱ्या तरुणांनी फूड डिलिव्हरी केली तर, मिनरल वॉटरचा टेम्पो चालवून पैसे जमा केले. अशी सगळी भट्टी जमून या तरुणांनी हे  गीत तयार केले. ही सगळी मुले २० ते २६ या वयोगटातली आहेत. कलाक्षेत्रात सांघिक रुपाने नवोदित युवा कलाकारांची ही पहिलीच कलाकृती आहे.

या गाण्याचे गीतकार आणि दिग्दर्शक व्यंकटेश गावडे याने फूड डिलिव्हरी करून गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पैसे जमवले. रोहित आयरे हा उत्तम सिनेमॅटोग्राफर असताना देखील आर्थिक आधारासाठी मिनरल वॉटरचा टेम्पो चालवतो. यातील काही या क्षेत्रात छोट्या मोठ्या भूमिका करतात. तर काही मालिकेमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम शिकतात.

श्रीकांत पंडित व श्रद्धा हिंदळकर या गायकांनी हे गीत गायले असून संदीप पालेकर यांनी स्वरबद्ध केले आहे. आयरे यांनी गीताचे चित्रण केले असून प्रतिक फणसे यांनी संकलन केले आहे. गणेश गुरव, नयन दळवी, पूजा मौली, अमरजा गोडबोले या कलाकारांवर हे गीत चित्रीत झाले आहे. स्वराज्याचे सुराज्य कसे घडेल यासाठी आजच्या तरुणाने महाराजांचे कोणते विचार अंगिकारले पाहिजे याचे चित्रीकरण या गाण्यात केलेले आहे.

मागील तीन वर्षांपासून या गाण्यासाठी निर्माता शोधत होतो. परंतु, नवीन मुलं अनुभव नाही. म्हणून, कुणी तयार झालं  नव्हतं. हर्षद सुर्वे आणि युवराज सनस यांनी विश्वास दाखवला आणि त्यामुळेच या गाण्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘राजे दैवत हो’ हे शिवगीत नुकतेच प्रदर्शित झाले. महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला त्यांना समजणाऱ्या समाज माध्यमातून कळावा हा या गीताचा उद्देश असल्याचे दिग्दर्शक गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीdombivaliडोंबिवली