कल्याण- शहराच्या पश्चिम भागतील सिद्धीविनायक रुग्णालयातील आयसीयूमध्ये साप शिरला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्याला ऑक्सिजन सिलेंडरवरती हा साप दिसला. सापाला पाहून कर्मचारी भयभीत झाला. त्याने रुग्णालयातील अन्य कर्मचारी वर्गास ही बाब सांगितली. तेव्हा वॉर फाउंडेशनच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्यात आला. प्राणी मित्र प्रेम आहेर आणि अक्षय वेखंडे या दोघांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. सापाला पडकले. पकडण्यात आलेला साप हा धामण होता. तो बिनविषारी असल्याचे कळताच रुग्णालयाती सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या धामण जातीचा सापाला वन विभागाच्या हवाली केले जाणार आहे. वन विभागाकडून त्याला पुन्हा जंगलात सोडून दिले जाणार आहे.
कल्याणमधील रुग्णालयातील आयसीयूमध्ये घुसला साप
By मुरलीधर भवार | Updated: November 25, 2023 16:40 IST