शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील आरक्षित भूखंडाला पत्र्याचे संरक्षण कवच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:09 IST

उल्हासनगरात सर्रासपणे आरक्षित भूखंड, खुल्या जागा, शासकीय जागेवर अतिक्रमण होऊन जागेच्या सनद काढल्या आहेत.

उल्हासनगर : शहरातील आरक्षित व खुल्या भूखंडावर अतिक्रमण होत असताना शुक्रवारी महसूल विभागाने सी ब्लॉक येथील एका खुल्या भूखंडाला पत्र्याचे संरक्षण कवच देण्याचा प्रयत्न केला. मात्र हे संरक्षण कवच किती दिवस राहणार, याबाबत सोशल मीडियावर चर्चेला ऊत आला आहे.

 उल्हासनगरात सर्रासपणे आरक्षित भूखंड, खुल्या जागा, शासकीय जागेवर अतिक्रमण होऊन जागेच्या सनद काढल्या आहेत. यातून महापालिका शाळा मैदान, पोलीस वसाहत, महाराष्ट्र जिवण प्राधिकरण कार्यालयाचे निवासस्थान व शहरातील खुल्या जागा सुटल्या नाही. हे कमी म्हणून की काय वालधुनी नदी पुरनियंत्रण रेषा व किनाऱ्यावरील जागेची सनद घेऊन, त्याबदल्यात महापालिकेकडून कोट्यावधीचा टीडीआर घेतल्याचे आरोप होत आहे. अश्या वेळी महसूल विभागाने सीब्लॉक येथील एका खुल्या भूखंडाला पत्र्याची संरक्षण भिंत बांधली. तसेच सरकारी भूखंड (शासनाची मालमत्ता) असे नामफलक लावले. महसूल विभागाच्या या कामाचे शहरात कौतुक होत आहे. तर दुसरीकडे भूखंडा भोवती किती दिवस पत्र्याचे संरक्षण कवच राहते. असी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यापूर्वीही अनेक भूखंडावर लावण्यात आलेले शासनाची मालमत्ता नामफलक गेले कुठे? असा प्रश्नही विचारला जात आहे.

 भुमाफीया सक्रिय शहरातील अनेक आरक्षित जागा व खुल्या जागेवर भुमाफीयांची नजर पडली असून त्यावर सनद काढल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रांत कार्यालयाकडून अश्या सनद दिल्या गेल्याने, काही वर्षांपूर्वी नागरिकांनी सनद रद्द करण्यासाठी मोर्चे काढले होते. महसूल विभागाच्या कारवाईने भुमाफीयाचे धाबे दाणणले असून ते सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.