शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र दुर्घटना! शौचालयातील भांड्यासह गर्भवती पडली टाकीत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 07:29 IST

स्थानिक महिलांनी केडीएमसीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिलांनी सांगितले की, शौचालयाच्या दुरवस्थेबाबत वारंवार मनपाकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : सार्वजनिक शौचालयात गेलेली गर्भवती महिला भांड्यासह टाकीत पडल्याची घटना मोहने येथील लहुजी नगरात बुधवारी पहाटे घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा प्राण वाचला आहे. टाकीत पडलेल्या महिलेस नागरिकांनी बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मनपाने दुर्घटनाग्रस्त शौचालय नागरिकांच्या वापरासाठी बंद केले आहे. तेथे पर्यायी शौचालयाची व्यवस्था केल्याची माहिती दिली आहे. 

लहुजी नगरात राहणारी उमा रिठे (वय २२) ही गर्भवती महिला बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास शौचालयात गेली होती. त्यावेळी ती शौचालयाच्या भांड्यासह शौचालयाच्या टाकीत पडली. ती टाकीत पडताच तिने बचावासाठी आरडाओरडा केला. तेव्हा नागरिकांनी शौचालयाच्या दिशेने धाव घेतली. तिला तातडीने टाकीच्या बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. ज्या शौचालयात ही घटना घडली, ते २० वर्ष जुने असून, त्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे.

या प्रकारामुळे स्थानिक महिलांनी केडीएमसीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिलांनी सांगितले की, शौचालयाच्या दुरवस्थेबाबत वारंवार मनपाकडे तक्रारी करूनही त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ही घटना घडली. महिला बचावली नसती तर तिच्यासह तिचे बाळ हे टाकीत गुदमरून जिवानिशी गेले असते. सामान्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास मनपास वेळ नाही. स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवून काय उपयोग? आधी सार्वजनिक शौचालये नीट करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

 नवीन शौचालय उभारण्याचा प्रस्ताव या संदर्भात प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते म्हणाले की, दुर्घटनाग्रस्त शौचालये नागरिकांच्या वापरासाठी बंद केली आहेत. नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल शौचालयाची व्यवस्था केली आहे. घटनास्थळी जल-मल निस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनीही भेट दिली. शौचालय नव्याने बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, जागा एनआरसी कंपनीची असून, ती आता अदानी उद्योग समूहाच्या मालकीची आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जागा देण्याची मागणी मनपाने केली आहे. 

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला