शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या पत्रीपुलाजवळ होणा-या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त पाहणी 

By अनिकेत घमंडी | Updated: April 3, 2024 20:45 IST

महापालिका, एमएसआरडीसी व शहर वाहतूक शाखा अधिका-यांची संयुक्त पाहणी.

 डोंबिवली:  महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा कल्याण शिळ रस्ता हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारित आहे. सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसी मार्फत सुरू असून यातील कल्याण येथील पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचे काम नुकतेच एमएसआरडीसी ने सुरु केले आहे. सदर कामामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याबाबत तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्याने याबाबतीत सर्व संबंधितांसोबत संयुक्त पाहणी करून उपाययोजना करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज या सदर ठिकाणी महापालिका, एमएसआरडीसी व शहर वाहतूक शाखा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. एमएसआरडीसी मार्फत कल्याण शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम झालेले असून ज्या भागातील रस्त्याची कामे अपुर्ण आहेत ती हाती घेण्यात आलेली आहेत. पत्रीपुलाच्या उतारावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने पावसाळयापुर्वी पुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी एमएसआरडीसी कडून देण्यात आली. तसेच येथील प्रचंड रहदारीमुळे फक्त रात्री १२.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत काम करण्यास अनुमती असल्याने कामाचा वेग ठेवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी पाहणी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार या ठिकाणी एकूण चार मार्गांचे काम असून पहिला मार्ग अंतिम टप्प्यात आहे तसेच उरलेल्या तीन मार्गांची कामे ३० एप्रिल पूर्वी पूर्ण करणे बाबत सूचना संबंधित अभियंता व ठेकेदार यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर कामाचा वेग तातडीने वाढविणे, कामासाठी रात्री १०.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत एमएसआरडीसीला अनुमती देणे व वाहतुक कोंडीचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने वाढीव १५ ते २० ट्रॅफिक वॉर्डन शहर वाहतूक शाखेत उपलब्ध करण्याबाबत सूचना महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी संबंधिताना दिल्या. 

सदर ठिकाणी असलेल्या खड्डयांमुळे वाहतुकीस होणारा त्रास कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने हे काम होणे आवश्यक असल्याने त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व अशा आशयाच्या आवाहनाचे सुचना फलक लावण्याच्या सूचना महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी एमएसआरडीचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या.सदर पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अनिरुध्द बोर्डे, शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाट व त्यांचे प्रतिनिधी तसेच साकेत इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गुरमे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याण