शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील राैनक सिटीतील इमारतीमधील फ्लॅटला लागली आग; वयाेवृद्ध महिला भाजून जखमी

By मुरलीधर भवार | Updated: March 1, 2023 18:19 IST

तासाभरात अग्नीशमन दलाने आगावर मिळविले नियंत्रण

कल्याण- शहरातील पश्चिमेतील राैनक सिटी इमारतीतील एका फ्लॅटला आज दुपारी आग लागल्याने या आगीत ६९ वर्षीय वृद्ध महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेचे नाव रचना काैशीक असे आहे. तिला उपचारासाठी नवी मुंबईतील एेराेली येथील बर्न रुग्णालयात  पाठविण्यात आले आहे. आग विझवण्याकरीता अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या आगीत महिलेचा फ्लॅट जळून खाक झाला आहे.

राैनस सिटीच्या एका इमारतीली १४ व्या मजल्यावर आज आग लागली. ज्या घरात आग लागली. त्या घरात रचना काैशीक राहतात. त्या दुपारी घरी स्वयंपाक तयार करीत हाेता. त्यावेळी त्यांच्या कपड्याने पेट घेतला. त्यांच्या फ्लॅटमधून धूर येऊ लागला. बचावासाठी रचना यांनी आरडाआेरडा केला. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना त्याठिकाणाहून बाहेर काढले. कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्या आगीत जास्त भाजल्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रचना या इमारती भाड्याने राहतात. आगीच्या घटनेची माहिती नागरीकांनी अग्नीशमन दलास दिली.

अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रचना यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुन्हा त्यांच्या फ्लॅटमधून धूर येऊ लागला. त्यांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतला हाेता. ताे कपडा त्याच ठिकाणी राहिल्या असल्याने त्याठिकाणी पुन्हा आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली. या आगीत रचना यांचा फ्लॅट जळून खाक झाला आहे. त्यांच्या घरातील वस्तूंचे आगीत नुकसान झाले आहे. अग्नीशमन दलाची गाडी आग विझविण्यासाठी आली त्या गाडीचा पाईप हा फुटलेला हाेता. त्यामुळे गाडीच्या पाईपमधून आगीसाठी वापरण्यात येणारे पाणी आग विझविण्या आधीच वाया जात हाेते. हा प्रकार पाहून इमारतीतील नागरीकांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :fireआगkalyanकल्याण