शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत साकारणाऱ्या रामललाच्या मूर्तीचे थेट बदलापूर कनेक्शन

By पंकज पाटील | Updated: January 9, 2024 19:33 IST

बदलापूरच्या चित्रकाराने मूर्तीसाठी तयार केले चित्र; देशातील चार चित्रकारांच्या चित्राच्या आधारे तयार केलीये मूर्ती

पंकज पाटील

बदलापूर - बदलापुरात राहणारे ज्येष्ठ चित्रकार सचिन जुवाटकर यांनी अयोध्येतील राम लल्लाच्या मुख्यमूर्तीसाठी चित्र साकारले. या चित्राचा काही भाग मूर्ती साकारताना स्वीकारण्यात आला आहे. देशभरातील दिग्गज चित्रकरांकडून राम लल्लाच्या मूर्तीसाठी चित्र मागवण्यात आले होते. त्यात सचिन जुवाटकर यांच्याही चित्राचा समावेश होता.         

अयोध्येत साकारण्यात आलेल्या राम मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मुख्य मूर्तीचे कोरीव काम करण्यासाठी देशभरातील दिग्गज चित्रकारांना राम लल्लाचे चित्र रेखाटण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार देशभरातील अनेक चित्रकारांनी मूर्ती तयार करण्यासाठी आपल्या कल्पकतेचा विचार करून चित्र साकारले. मात्र समितीने या चित्रांचे परीक्षण केल्यानंतर देशभरातील चार चित्रकारांचे चित्र स्वीकारले. त्यात मुंबईचे वासुदेव कामत आणि बदलापूरचे सचिन जुवाटकर यांच्या चित्राचा समावेश होता. तर समितीशी संलग्न असलेले चित्रकार विश्वकर्मा यांच्या देखील चित्राचा महत्त्वाचा भाग मूर्ती तयार करताना स्वीकारण्यात आला. देशभरातील चार दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या चित्राच्या आधारावरच अयोध्येतील राम लल्लाची मूर्ती साकारण्यात आली आहे. ज्यांच्या देखरेखीखाली राम मंदिराची उभारणी केली जात आहे ते डॉक्टर सच्चिदानंद जोशी यांच्यामुळेच आपल्याला राम लल्लाची सेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया जुवाटकर यांनी दिली. 

राम लल्लाची मूर्ती पाच वर्षे वयोगटातील: राम मंदिराची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे ती मूर्ती पाच ते सहा वर्ष वयोगटातील रामाची मूर्ती असून त्या वयोमानानुसारच चित्र साकारण्यात आले होते.

सुचवलेल्या सूचनांचा केला आदर :  जुवाटकर यांनी राम राम लल्लाचे रेखाटलेले चित्र आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समितीकडे सादर केल्यानंतर त्यांच्या सूचनांचा आदर समितीने केला. 

जी मूळ मूर्ती साकारण्यात येत आहे त्यात जुवाटकर यांनी आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून केलेल्या काही सूचनांचा देखील सहभाग करून घेण्यात आला आहे. 

निमंत्रण पत्रिकेवरही राम लल्लाचे चित्र: आयोध्यात साकारण्यात आलेल्या राम लल्लाच्या मूर्तीसाठी जे चित्र निश्चित करण्यात आले आहे त्या चित्राचा वापर मुख्य निमंत्रण पत्रिकेवर देखील करण्यात आला आहे.

''राम लल्लाची मूर्ती साकारण्यासाठी जे चित्र अपेक्षित होते ते चित्र पाठवण्यासाठी मला कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कल्पना दिली. त्यांच्यामुळेच आज आपल्या चित्राचा काही भाग राम लल्लाचा मूर्तीत वापरल्याचा आपल्याला कायमस्वरूपी आनंद आहे. - सचिन जुवाटकर, चित्रकार बदलापूर

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याbadlapurबदलापूर