शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली पश्चिमेतील मोठा गावातील वाहतूक कोंडी टाळण्याकरीता डी  कन्जेशनचा प्लान तयार

By मुरलीधर भवार | Updated: April 6, 2023 18:20 IST

डोंबिवली पश्चिमेतील मोठा  गाव ते माणकोली खाडी पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल मे अखेर्पयत वाहतूकीसाठी खुला होणार आहे.

डोंबिवली-

डोंबिवली पश्चिमेतील मोठा  गाव ते माणकोली खाडी पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल मे अखेर्पयत वाहतूकीसाठी खुला होणार आहे. हा पूल खुला झाल्यावर मोठा गाव परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकते. ही वाहतूक कोंडी टाळण्याकरीता डी कन्जेक्शनचा प्लान तयार करण्यात आला असून त्याचे काम लवकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.

आयुक्त दांगडे यांनी आज मोठा गाव परिसरात पाहणी दौरा केला. हा डी कन्जेक्शनचा प्लान कसा असावा त्यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात. याची सूचना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केल्या होत्या. पाहणी दौ:या माजी नगसेवक म्हात्रे यांच्यासह सहाय्यक संचालक नगररचनाकार दीक्षा सावंत, शहर अभियंते अजरून अहिरे, सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते आदी उपस्थित होते.

आयुक्त दांगडे यांनी सांगितले की, सध्या डोंबिवली मोठा गाव फाटक हा रस्ता सुरु आहे तो पुढे माणकोली खाडी पूलाशी जोडला जाणार आहे. त्याचबरोबर रिंग रोडच्या तिसरा टप्पा हा मोठा गाव ते दुर्गाडी आहे. त्याची निविदा काढली आहे. त्याच्या  कामाला एमएमआरडीकडून सुरुवात होणार आहे.या रिंग रोडच्या मागच्या बाजूस दीडशे मीटर अंडरपास आणि दिवा वसई रेल्वे मार्गाला कोपर्पयत समांतर रस्ता तसेच त्याठिकाणी असलेला अंडर पास ही दोन्ही कामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहेत. ही कामे माणकोली खाडी पूल वाहतूकीसाठी खुला होण्यापूर्वी मार्गी लावण्यात यावी असे एमएमआरडीएला सांगण्यात आले आहे. रेल्वे उड्डाणपूलाही राज्य सरकारकडून निधी मिळणे अपेक्षितसध्या मोठा गाव येथे दिवा वसई मार्गावर रेल्वे फाटक आहे. त्याठिकाणी रेल्वे उड्डाण पूलाचे काम केले जाणार आहे. त्याकरीता १९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्या कामाकरीता रेल्वेच्या डेडीकेटेड फ्रेंट कॉरीडॉर प्रकल्प प्रमुखांनी ३० कोटी रुपये खर्चाची तयारी दर्शविली आहे. मात्र १६८ कोटी रुपयांचा निधी महापालिका उभारु शकत नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. हा निधी राज्य सरकार महापालिकेस उपलब्ध करुन देण्यास सकारात्मक असल्याचे आयुक्त दांगडे यांनी सांगितले.