शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

८ महिला आंदोलक मुक्त, २२ कोठडीत, रेल्वे न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 09:30 IST

रेल्वे पोलिसांनी जवळपास ३०० अनोळखी आंदोलकांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

कल्याण : बदलापुरातील शाळेत घडलेल्या गैरप्रकाराच्या निषेधार्थ बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन करणाऱ्या ज्या २२ आंदोलकांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती त्यांना बुधवारी रेल्वे न्यायालयाने कोठडी सुनावल्याने सगळ्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या आठ महिलांची रेल्वे न्यायालयाने मुक्तता केली. रेल्वे पोलिसांनी जवळपास ३०० अनोळखी आंदोलकांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

सुमारे ३०० जणांविरोधात रेल्वे पोलिस कायदा, भारतीय रेल्वे कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि भारतीय दंड संहिता यामधील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ३० जणांना कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील आठ महिला आंदोलकांना न्यायालयाने सोडून दिले. उर्वरित २२ पुरुष आंदोलकांना न्यायालयात हजर केले. या २२ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन घ्यावा लागणार आहे. 

वकील प्रियेश जाधव आणि पंकज अटकळे हे कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कागदपत्रांवर सही घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी पोलिसांनी या वकिलांना अटकाव केला. दोन्ही वकिलांनी रेल्वे पोलिसांच्या कृतीविषयी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले की, रेल्वे पोलिस ठाण्यातील लॉकअपनजीक सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. दोन वकिलांना आरोपींच्या सह्या घेण्याकरिता सहकार्य केले आहे. त्यांनी लावलेला आरोप चुकीचा आहे. 

वकिलांचा पवित्राबदलापूर वकील संघटनेचे अध्यक्ष मंगेश गवळी यांनी सांगितले की, बदलापूरच्या आंदोलनाकरिता अटक केलेले २२ जण हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी ही मंडळी आली होती. आंदोलन शांततेने सुरू होते. पोलिसांनी लैंगिक अत्याचाराबाबत वेळीच गुन्हा दाखल केला असता तर ही वेळ आली नसती. पोलिसांनी आंदोलकांवर अजामीनपात्र कलमे लावली आहेत. यामधील अनेकांवर नाहक आरोपीचा शिक्का लागला.

टॅग्स :Courtन्यायालय