शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये मेडिकल दुकानाचा परवाना देण्यासाठी ७० हजाराची लाच, औषध निरीक्षकास साथीदारासह अटक

By मुरलीधर भवार | Updated: July 9, 2024 15:32 IST

मेडिकलचे दुकान सुरु करण्यासाठी अन्न व औषध विभागाचा परवाना लागतो. कल्याणच्या एका तरुणाला मेडिकलचे दुकान सुरु करायचे होते. त्यांनी अन्न व औषध विभागाकडे तसा अर्ज केला होता.

कल्याण-मेडिकल दुकानदाराला दुकान सुरु करण्यासाठी परवाना देण्याच्या बदल्यात ७० हजार रुपयांची लाच स्विकारता औषध निरीक्षक संदीप नारायण नरवणे याला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. नरवणे यांचा साथीदार सुनिल बाळू चौधरी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. ज्याच्याकडून नवरणे याने लाच स्विकारली तो दुकानदार कल्याणचा रहिवासी आहे. त्याला कल्याणमध्ये मेडिकलचे दुकान सुरु करायचे आहे.

मेडिकलचे दुकान सुरु करण्यासाठी अन्न व औषध विभागाचा परवाना लागतो. कल्याणच्या एका तरुणाला मेडिकलचे दुकान सुरु करायचे होते. त्यांनी अन्न व औषध विभागाकडे तसा अर्ज केला होता. त्यांना परवाना देण्याच्या बदल्यात औषध निरीक्षक नरवणे याने १ लाख रुपयांची मागणी केली होती. १ लाख रुपये दिले तरच परवाना दिला जाईल असे सांगितले होते.

अखेरीस तडजोड करुन नरवणे यांनी ७० हजार रुपये घेण्याचे कबूल केले. या प्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबईतील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांकडे तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील डी मार्ट जवळ सापळा रचला होता. यावेळी त्याठिकाणी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्विकारण्याकरीताऔषध निरीक्षक नरवणे व त्यांचा साथीदारा सुनिल चौधरी त्याठिकाणी पोहचले. ७० हजार रुपयाची लाच स्विकारता दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक संतोष पाटील यांनी केली. या प्रकरणी नवरणे याच्यासह त्याचा साथीदार चौधरी या दोघांच्या विरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.