शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कल्याण-डोंबिवलीत दिवसाला होणार ७ हजार कोरोना टेस्ट; विजय सूर्यवंशी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:39 IST

रवींद्र चव्हाण यांनी घेतली भेट, पूर्वेत मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यासोबत खासगी रुग्णालयात जी लसीकरणाची केंद्रे सुरू आहे

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवले जाणार अहे. सध्या तीन हजार ५०० केल्या जात आहेत. त्यात दुप्पट वाढ करून दिवसाला सात हजारांच्या घरात टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भाजप शिष्टमंडळास दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र, डोंबिवली पूर्वेत महापालिकेने मोफत लसीकरण केंद्र सुरू केलेले नाही. यामुळे या भागात मोफत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली. त्यावेळी बोलताना आयुक्तांनी हा मानस व्यक्त केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते.

महापालिकेने डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डोंबिवलीतील रुग्णांची संख्या वाढ जास्त आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लस मोफत देण्याची सुविधा डोंबिवली पूर्व भागात नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयात जावे लागते. तेथे जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय वेळ व पैशाचा अपव्यय होत असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. 

पूर्वेत मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यासोबत खासगी रुग्णालयात जी लसीकरणाची केंद्रे सुरू आहे. त्या ठिकाणी केवळ एका दिवसाला १०० जणांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यात वाढ करून दिवसाला किमान ५०० जणांचे लसीकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली. आयुक्तांनी नेमका किती लस साठा मागविला आहे. त्याचा पुरवठा का होत नाही. कमी का मागविला जात आहे, याबाबतही चव्हाण यांनी जाब विचारला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkdmcकल्याण डोंबिवली महापालिका