शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी दिली ५० हजाराची मदत

By मुरलीधर भवार | Updated: January 14, 2023 17:13 IST

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी ५० हजाराची मदत करण्यात आली. 

कल्याण : शहराच्या पश्चिम भागतील आग्रा राेडवर गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे विलास कांगणे यांची मुलगी अनघा हीचा वैद्यकीय शिक्षणाकरीता मेरीटमध्ये नंबर आला आहे. तिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीने ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. समितीने अनघाला शिक्षणासाठी मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

कांगणे हे वृत्तपत्र विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यातून त्यांना महिन्याकाठी १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. या मिळकतीवर ते कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवितात. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा नसली तरी सरस्वतीची कृपा झाली आहे. त्यांची मुलगी अनघा हीचा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शिक्षणाकरीता मेरीटमध्ये नंबर लागला आहे. तिच्या शिक्षणासाठी वर्षाला साडे चार लाख रुपयांचा खर्च आहे. हा खर्च भागविण्यासाठी तिच्या पालकांनी बॅंकेतून शिक्षणासाठी कर्ज काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. काेराेना काळात वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायावर गदा आली हाेती. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते त्यांना वेळेवर भरता आले नाही. त्यामुळे नव्याने कर्ज देण्यास बॅंकेने नकार दिला.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनघाची फी कूठून आणि कशी भरायची असा प्रश्न उभा ठाकला. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही अडचण त्यांनी कथीत केली.मुलगी अनघाची फी भरली नाही तर वर्ष वाया जाणार अशी चिंता त्यांना सतावित हाेती. वंजारी सेवा समितीने दाेन दिवसात ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले. समितीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांनी रक्कम जमा करुन वंजारी समितीच्या  अध्यक्ष शंकर आव्हाड यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश अनघाला दिला आहे. या प्रसंगी समितीचे पदाधिकारी अर्जून डाेमाडे, रामनाथ दाैंड, आत्माराम फड, अर्जून उगलमुगले, सनिल आंधळे, सतीश दराडे आदी उपस्थित हाेते. कांगणे यांनी समितीचे आभार मानले आहेत. तसेच मुलीच्या शिक्षणाच्या वाटेतील फीची अडचण दूर झाल्याने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

  

टॅग्स :kalyan-pcकल्याणEducationशिक्षण