शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

कल्याण-डोंबिवलीतील ३६० कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात

By मुरलीधर भवार | Updated: December 19, 2022 17:34 IST

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधीक भूमीपूजन करून रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

कल्याण- कल्याणडोंबिवलीतील विविध प्रभागांतील रस्त्यांच्या कामांना रविवारी प्रत्यक्ष सुरूवात झाली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधीक भूमीपूजन करून रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवली शहरातील रस्ते कामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ३६० कोटी रुपयांचा निधी खासदार शिंदे यांनी मंजूर करुन आणला आहे. या निधीपैकी कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व परिसरातील ११० कोटी ६० लाख रुपये खर्चातून होणाऱ्या ११ विविध रस्त्यांच्या कामांना रविवारी सुरूवात झाली.

या प्रसंगी आमदार राजू पाटील, गणपत गायकवाड, पदाधिकारी राजेश कदम, राजेश माेरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, महेश गायकवाड, निलेश शिंदे, माधूरी काळे, प्रशांत काळे, विशाल पावशे आदी उपस्थित होते.

या रस्त्यांचे हाेणार आहे काॅन्क्रीटीकरण -उंबार्ली पाईपलाईन ते उंबार्ली स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता नूतनीकरण, मानपाडा शिवमंदिर ते संदप उसरघर स्त्याचे काँक्रीटीकरण, क्रिस्टल प्लाझा ते गोदावरी बिल्डिंग रस्ता (कल्याण ईस्ट लोकग्राम), १०० फुटी रस्ता ते तिसाई मंदिर रास्ता , विजयनगर नाका ते आमराई (धर्मवीर आनंद फिघे साहेब चौक), नूतन विद्यामंदिर शाळा ते नाना पावशे चौक, शिवाजी कॉलोनी ते जुनी जनता बँक, कल्याण पूर्व चिंचपाडा कमान ते डी. एम.एम. शाळेपर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण, काटेमनावली नाका - हनुमान नगर - हरिभाऊ पाडा - साईबाबा नगर - कैलास नगर - म्हसोबा चौक - खडेगोलवली पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, विठ्ठलवाडी स्टेशन ते सूर्या शाळेपर्यंत च्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जगदीश दूध डेअरीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

खाेणी ते काटई नाका दरम्यानची एक मार्गिका खुली -खाणी ते काटई नाका या मार्गिकेच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. खासदार शिंदे यांच्या प्रयत्नातून या मार्गासाठी २० कोटी ४० लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. यातील एक मार्गिका यापूर्वीच प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली