शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

पलावा सिटी मध्ये 330 भटक्या श्वानांना दिली अँटी रेबीज ची लस

By मुरलीधर भवार | Updated: January 26, 2024 16:28 IST

रेबिजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने जडतो.

डोंबिवली: रेबिजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने जडतो. या भयानक रोगाविषयी लोकजागरण व्हावे तसेच त्याचे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी 'एकच औषध' उपलब्ध असावे, या हेतूने हा दिवस २००७ पासून जागतिक रेबीज दिवस ही पाळला जातो.  रेबिजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत.या विशिष्ट दिवशी लसीकरण मोहीम, कुत्र्यांचे नपुसंकीकरण, धावण्याच्या स्पर्धा (रन फॉर रॅबिज), कवायती, शैक्षणिक सभासत्रे, विविध सोहळे आणि कार्यक्रम आयोजित होतात. पहिल्या रेबिज दिनाच्या कार्यक्रमावेळी ७४ देशांतील ४ लाख लोकांनी भाग घेतला होता, त्यावरून रेबिज रोगाचा सर्वसामान्य माणसाने किती धसका घेतलेला असतो, हे लक्षात येते. 

एकत्रित येऊन रेबिजला भूतकाळात गाडा' या सूत्राने विश्व रेबिज दिनाचे सोहळे आयोजित होतात.रेबिज हा रोग बरा होतो, तरीही जगभरात दर दहा मिनिटाने एक पेशंट या रोगाने बाधित होऊन मृत्युमुखी पडतो. दरवषीर् जगभरात ५२,५६० जण रेबिजमुळे दगावतात. यात मुख्य वाटा १५ वर्षे वयोगटाखालील मुलांचा असतो. लस न टोचलेले कुत्रे मुलांना चावल्याने हा रोग प्रामुख्याने जडतो आणि या लसीकरणाकडे जगभरात सर्रासपणे दुर्लक्ष होते. कारण या औषधाची किंमत गरीबांना परवडणारी नसते.जगातील बर्‍याच देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. विकसनशील जगात सर्व मानवी मृत्यूंपैकी ९९% मृत्यू  रेबीड कुत्रा चावल्यामुळे होतात, तर आफ्रिका आणि आशियात ९५% मृत्यू होतात. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खंडातील लोक आणि प्राणी यांना रेबीजचा धोका संभवतो.

डोंबिवली येथील पलावा सिटी मध्ये आज रेबीज प्रतिबंधक लसीकरण आयोजित केली गेली. प्रसिद्ध संस्था पॉज ने ही मोहीम आज राबवली. सुमारे ३०० च्या वर भटक्या जनावरांना ही लस टोचन्यात आली. तसेच पॉज संस्थेचे निलेश भणगे, बालाजी हरिहरन, रीमा देशपांडे, अभिषेक सिंग, ऋषिकेश सुरसे, कौस्तव भट्टाचारजी आणि हरिहरन रामास्वामी ह्यांनी विशेष मेहनत घेतली.

पलावा सिटी च्या सर्व क्लस्टर मध्ये ही मोहीम आज २६ जानेवारी च्या निमित्त आज केली गेली. पलावा तर्फे शिबु चक्रवर्ती, संकेत शुक्ला ह्यांनी श्वान पकडण्यास मदत केली. गेल्या वर्षी एका व्यक्तीवर कुत्रा धावून गेल्यामुळे पलावा ईथे श्वानांना खायला ही देण्यास मज्जाव करण्याचे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले होते. ह्यावर पॉज संस्थेच्या वतीने ओबजेक्शन घेऊन हे फलक काढावं म्हणून नोटीस ही पाठवण्यात आल्या. तसेच पलावा मध्ये तातडीने नसबंदी साठी गाड्या पाठवून बरेचसे श्वान नसबंदी करून घेतले. 

पलावा ला बाऊंडरी नसल्याने डॉग बाहेरून येत असल्याने गोंधळ होत आहे असे निलेश भणगे ह्यांनी सांगितले. डोंबिवली - कल्याण परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त पॉज संस्था दरवर्षी रेबीज लसीकरण मोहीम चालवते. गेल्या वर्षी सुमारे ३५०० भटक्या श्वानांना लास देण्यात आली ह्यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

दर पंधरा दिवसांनी पॉज चे कार्यकर्ते कॉलनी मध्ये फिरून ही मोहीम राबवत असतात आणि ह्याची सुरवात २००१ मध्ये झाली. 'ही मोहीम गेली २४ वर्षे पॉज अविरत चालवत आहे आणि ह्याच मुळे कल्याण डोंबिवली शहरात एकही व्यक्ती चा मृत्यू रेबीज मुळे नोंदला गेला नाही. असे पॉज च्या संस्थापक अनुराधा रामस्वामी ह्यांनी सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली