शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील स्वराज दहिहंडी उत्सावात गोविंदा पथकाकरीता १५ लाखांची बक्षिसे

By नितीन पंडित | Updated: September 4, 2023 16:58 IST

हंडी फोडणाऱ्या डोंबिवलीतील गोविंद पथकाला १ लााख ५१ रुपये, मुंबतील गोविंद पथकाला १ लाख रुपये आणि महिला गोविंद पथकाला ५१ हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे.

डोंबिवली - दीपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने यंदाही स्वराज दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सावात १५ लाखाची बक्षिसे गोविंदा पथकाना वापट केली जाणार आहे. त्याचबरोबर गतिमंदानाही दहिहंडीचा आनंद घेता यावा यासाठी दहिहंचा प्रातिनिधीक थर क्षतिज गतिमंद शाळेचे विद्यार्थी उभारणार असल्याची माहिती आयोजक दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

मागच्या वर्षीय फाऊंडेशनच्या वतीने दहिहंडी उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी कर्णबधीर शाळेच्या विद्यार्थ्याना दहिहंडी उत्सावातील प्रवाहात आणण्याच प्रयत्न केला गेला होता. यंदा डोंबिवलीतील क्षितीज गतीमंद विद्यार्थ्यांच्या शाळेतील विद्यार्थी दहिहंडीचा आनंद लूटणार आहे. आज फाऊंडेशनच्या वतीेन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस क्षितीज शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुरेखा गायकवाड आणि शिक्षिका अक्षदा दरेकर या उपस्थित होत्या. या उत्सावात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहे.

क्षितीज शाळेतील विद्यार्थ्यांच्या निमित्ताने गतीमंद विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या गरजा याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष या दहिहंडी उत्सावाच्या निमित्ताने वेधले जाणार आहे. या उत्सावात केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील आणि कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर ख्यातनाम लोक गायक आनंद शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम दहिहंडी उत्सावात गोविंदा पथकांसह मान्यवरांचे मनोरंजन करीत गोविंदा पथकाचा उत्साह वाढविणार आहे.

हंडी फोडणाऱ्या डोंबिवलीतील गोविंद पथकाला १ लााख ५१ रुपये, मुंबतील गोविंद पथकाला १ लाख रुपये आणि महिला गोविंद पथकाला ५१ हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे. ज्या गोविंदा पथकाकडून विविध थरांची सलामी देण्यात येईल. त्यांना देखील थर लावण्याचे बक्षिस दिले जाणार आहे. एकूण १५ लाख रुपयांची बक्षिसे वाटप केली जाणार आहेत. गोविंद पथकाच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात येईल. तसेच गोविंद पथकाकरीता फिरता दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय अग्नीशमन दलासह अत्यावश्यक सेवा पुरविण्याची काळजी घेण्यात आली आहे.