शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील १४१ आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर होणार

By अनिकेत घमंडी | Updated: September 8, 2022 15:54 IST

ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येणार आहे.

डोंबिवली: 

ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहूल गावांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत गावांमध्ये सविस्तर आराखडे तयार करण्याची सुचना केली. जिल्ह्यातील १२१ गावांची निवड झाली असून या योजनेसाठी केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाकडून २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी बैठकीत दिली.

अनुसूचित जमातीची म्हणजे आदिवासी समाजाची जास्त लोकसंख्या असलेल्या गावांचा आदर्श गाव संकल्पनेवर आधारित एकात्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील १२१ गावांची निवड झाली आहे. त्यात शहापूर तालुक्यातील ४४, भिवंडीतील ३६, मुरबाडमधील २५, अंबरनाथमधील १० व कल्याणमधील एका गावाचा समावेश असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर।केले. 

दरवर्षी एकपंचमांश गावांचा विकास केला जाणार असून, पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने सर्व गावांचा विकास केला जाणार आहे. या गावांमध्ये योजनेची परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्यासाठी  पाटील यांनी विशेष बैठक घेतली. केंद्राच्या इतर विभागाकडील योजना व राज्य सरकारच्या योजनांचे अभिसरणाच्या (कन्वर्जन) माध्यमातून आदिवासी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीकोनातून विकास आराखडे तयार करण्याच्या सुचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिल्या. या वेळी आमदार दौलत दरोडा, आदिवासी विभागाच्या शहापूर प्रकल्प अधिकारी आर. एच. किल्लेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक दीपक कुटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आदिवासींची लक्षणीय लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांद्वारे मुलभुत व पायाभुत सुविधा पुरविल्या जातील. त्याचबरोबर ग्रामस्थांचे आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रस्ते, दुरसंचार सुविधा, अंगणवाडी केंद्रे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कौशल्य वृद्धी कार्यक्रम, सामुदायिक वन विकास, वनधन कार्यक्रम, जलस्त्रोताचे संरक्षण आदी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या गावांचा आदर्श गाव म्हणून उदय होणार आहे.ठाणे जिल्ह्यातील गावांचा विकास करण्यासाठी महसुली गावानुसार आराखडा तयार करावा. आराखडा मंजूर झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या विकासयोजनांची सांगड घालून गावामध्ये योजना राबवावी. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आदिवासींच्या प्रगतीचा ध्यास : कपिल पाटीलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदिवासी गावांच्या विकासाबरोबरच आदिवासी माणसाच्या प्रगतीचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार देशभरात प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना राबविण्यात येत आहे. देशातील ३ हजार ६०५ गावांचा पाच वर्षांत विकास केला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील