शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

'कल्याण'मस्तू... महिना १० हजार कमावणाऱ्यास इन्कम टॅक्सची १ कोटी १४ लाख रुपयांची नोटिस

By मुरलीधर भवार | Updated: February 2, 2023 22:04 IST

वरक यांना त्यांच्या कंपनीकडून महिन्याला जेमतेम १० हजार रुपये पगार मिळतो. त्याचे वर्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये आहे.

कल्याण-कल्याणमधील ठाणकर पाडा येथे राहणारे चंद्रकांत वरक यांना इनकम टॅक्स विभागाकडून एक कोटी १४ लाख रुपयांची नोटिस पाठविण्यात आली. ही नोटीस पाहून वरक हे चक्रावून गेले आहेत. वरक हे ठाणकर पाडय़ातील दुर्गानगर येथे राहतात. ते ठाण्यातील एका कुरिअर कंपनीत हाऊस किपिंगचे काम करतात. ते आणि त्यांची बहिण हे दोघेच कुटंबातील सदस्य आहे.

वरक यांना त्यांच्या कंपनीकडून महिन्याला जेमतेम १० हजार रुपये पगार मिळतो. त्याचे वर्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये आहे. ते नेहमीप्रमाणे घरातून ठाण्याला कामावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना इमकम टॅक्सची नोटिस त्यांच्या हाती पडली. ही नोटिस चक्क एक कोटी १४ लाख रुपये रक्कमेची होती. या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले होते की त्यांच्या पॅनकार्डवरुन १ कोटी १४ लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे. त्यांच्या हाती पडलेली नोटिस त्यांनी अनेक वेळा वाचून काढली. मात्र त्यातील नमूद रक्कमेच्या ट्रान्झॅक्शनचा आकडा पाहून ते हवालदिल झाले. त्यांची स्थिती एकदम चक्रावून गेली. त्यांनी ही नोटिस मिळताच इनकम टॅक्स कार्यालयात धाव घेतली. तेव्हा त्याठिकाणच्या अधिकारी वर्गानेही त्यांना नोटिसमध्ये नमूद असलेला आशय विशद करीत पॅन कार्डवरुन १ कोटी १४ लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे. त्यामुळे वरक यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. मात्र, वरक यांनी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही.

दरम्यान, वरक यांच्या पॅन कार्डचा गैरवापर कोणी केला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरीत आहे. पॅन कार्डच्या आधारे ट्रान्झॅक्शन झालेली रक्कम ही थोडी थोडकी नसून १ कोटी १४ लाख रुपये असल्याने ते चक्रावून गेले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणIncome Taxइन्कम टॅक्सPoliceपोलिस