शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

यू मुम्बाने तेलगू टायटन्सला ४१-२० असे लोळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 03:36 IST

अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात यू मुम्बाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इंटर झोन सामन्यात बलाढ्य तेलगू टायटन्सला ४१-२० असे लोळवले.

पुणे : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात यू मुम्बाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इंटर झोन सामन्यात बलाढ्य तेलगू टायटन्सला ४१-२० असे लोळवले. यू मुम्बाच्या एकट्या सिद्धार्थ देसाईने तब्बल १७ गुणांची वसूली करत दोन संघातील फरक स्पष्ट केला.श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केलेल्या मुंबईकरांचा हल्ला थोपवणे टायटन्सला भारी पडले. आक्रमणासह बचावामध्येही जबरदस्त कामगिरी करताना मुंबईकरांनी टायटन्सच्या आव्हानातली हवाच काढली.मध्यंतराला १७-१२ अशी आघाडी घेतल्यानंतर मुंबईकरांनी जबरदस्त आक्रमक खेळ करताना टायटन्सला संधीच दिली नाही. सिद्धार्थ देसाईने १९ वेळा चढाई करताना त्यातून १७ गुण मिळवत टायटन्सला दबावाखाली आणले. सिद्धार्थ चढाईत गुण मिळवत असताना कर्णधार फझल अत्राचली, अबोलफझल मघसोद्लौ, सुरेंदर सिंग व विनोद कुमार यांनी भक्कम पकडी करत टायटन्सची हवा काढली.तेलगू टायटन्सकडून कर्णधार राहुल चौधरी याने एकाकी झुंज दिली त्याने आक्रमणात ७ गुणांची कमाई केली. मात्र इतर खेळाडू चढाईमध्ये अपयशी ठरले. त्याचप्रमाणे त्यांच्या पकडीही कमजोर ठरल्याने मुंबईकरांनी गुणांची लयलूट करताना सहज बाजी मारली. मध्यंतरानंतर जबरदस्त आक्रमक खेळ केलेल्या मुंबईकरांनी टायटन्सवर सामन्यात एकूण तीन लोन चढवत वर्चस्व राखले.अन्य लढतीत तामिळ थलाइवास संघाने शानदार विजय मिळवताना पुणेरी पलटनचा ३६-३१ असा पराभव केला. मध्यंतराला तामिळ संघाकडे १६-१५ अशी नाममात्र आघाडी होती. पुण्याने त्यांना कडवी झुंज दिली, मात्र अंतिम क्षणी झालेल्या चुकांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डी