शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ देसाईसाठी रंगली चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 07:05 IST

कबड्डी लीग लिलाव; तेलगू टायटन्सने मोजले १ कोटी ४५ लाख रुपये

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या मागील सत्रात आपल्या तुफानी खेळाने सर्वांचे लक्ष वेधलेल्या सांगलीच्या सिद्धार्थ देसाई याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी लीगच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वच संघांमध्ये चुरस रंगली. यामध्ये तेलगू टायटन्सने बाजी मारताना या आक्रमक खेळाडूला तब्बल १ कोटी ४५ लाख रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले.

सिद्धार्थने गेल्या हंगामात यू मुंबाकडून खेळताना आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळेच अपेक्षेप्रमाणे, यंदा सिद्धार्थसाठी मोठी चुरस रंगली. दरम्यान, गेल्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळवलेल्या मोनू गोयतचा विक्रम मागे टाकण्यात सिद्धार्थला ६ लाख रुपयांनी अपयश आले. गेल्या वर्षी लिलाव प्रक्रियेमध्ये मोठा भाव खालेल्या मोनू गोयतला यंदा हरियाणा स्टीलर्सने कायम ठेवले नाही. यूपी योद्धाने ९३ लाख रुपयांची किंमत मोजून गोयतला आपल्या चमूमध्ये समाविष्ट करून घेतले.

याशिवाय नितीन तोमर, राहुल चौधरी आणि अष्टपैलू संदीप नरवाल या अन्य स्टार खेळाडूंवरही मोठ्या बोली लागल्या. नितीन तोमरला पुणेरी पलटनने १ कोटी २० लाखांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. तामिळ थलाइवाने राहुल चौधरीसाठी ९४ लाख, तर यू मुंबाने संदीप नरवालसाठी ८९ लाख रुपये मोजले.

१९ जुलैपासून रंगणार कबड्डी लीगचा थरारप्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या सातव्या सत्राची रंगत १९ जुलै ते ९ आॅस्टोबर दरम्यान रंगणार असल्याची माहिती प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी यांनी दिली. ‘देशांतील सणांचा कालावधी लक्षात घेता यंदाच्या सत्रातील वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला,’ असेही गोस्वामी यांनी सांगितले.गोस्वामी यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षी लीगचे सहावे सत्र आॅक्टोबर महिन्यात सुरु झाले होते. मात्र यंदा आम्ही जुन्या वेळापत्रकाप्रमाणे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी देखील जुलै महिन्यातच कबड्डी लीग खेळविण्यात येईल.’ दरम्यान, सोमवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रीयेमध्ये १३ देशांतील एकूण ४४१ खेळाडूंचा समावेश होता. यामध्ये ३८८ खेळाडू भारतीय, तर ५८ विदेशी खेळाडू समाविष्ट होते.