शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League 2018: पुणेरी पलटणचा दणदणीत विजय, हरयाणा स्टीलर्सवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:09 IST

Pro Kabaddi League 2018 LIVE: पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डी लीगच्या सोमवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सवर 34-22 असा विजय मिळवला.

चेन्नई, प्रो कबड्डी लीग 2018 : पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डी लीगच्या सोमवारी खेळवल्या गेलेल्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सवर 34-22 असा विजय मिळवला. नितीन तोमर ( 7), जीबी मोर (6) आणि दीपक दहिया (5) यांनी चढाईत पुण्याला गुण कमवून दिले.

पुण्याने चढाईत 16 गुणांची, पकडीत 9 गुणांची कमावले. त्यांनी दोन वेळा हरयाणाच्या संघाला ऑलआऊट केले आणि पाच बोनस गुण जिंकले. 

पुण्याच्या जीबी मोरने पहिल्या सुपर 10 गुणांची कमाई केली.

हरयाणाच्या विकास कंडोला, सुनील व सुरेंदर नाडा यांना संघर्ष केला, परंतु अखेरच्या पाच मिनिटापर्यंत पुण्याने सामना 30-17 असा आपल्या बाजूने झुकवला होता. 

दुसऱ्या सत्रात पुण्याने आपली आघाडी कायम राखताना हरयाणाला चांगलेच झुंजवले. नितीन तोमर, जी बी मोरे आणि दीपक दहिया यांनी हरयाणाचा बचाव निकामी केला. पुण्याने मध्यंतरानंतरच्या पहिल्या दहा मिनिटांच्या खेळात आघाडी 22-17 अशी वाढवली होती. 

पुणेरी पलटणच्या नितीन तोमरने 17 व्या मिनिटाला हरयाणावर लोण चढवताना 13-8 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पहिल्या सत्रात पुण्याकडे 15-9 अशी आघाडी घेतली होती.

पहिल्या दहा मिनिटांत दोन्ही संघांकडून सावध खेळ झाला. सहाव्या पर्वातील पहिलाच सामना खेळणाऱ्या हरयाणा स्टीलर्सने एका गुणाची आघाडी कायम राखण्यावर भर दिला. 

पुणेरी पलटन भिडणार हरयाणा स्टीलर्स यांच्याशी

पहिल्या सामन्यात हातातून गेलेला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर पुणेरी पलटन संघाच्या खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात हा संघ कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी त्यांच्यासमोर हरयाणा स्टीलर्सचे आव्हान असणार आहे. पुणेरी पलटनने सलामीच्या सामन्यात यू मुंबाला 32-32 असे बरोबरी रोखले होते.  असे असतील संघ 

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीग 2018Pro-Kabaddiप्रो-कबड्डी