शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

प्रो कबड्डी : तेलगू टायटन्सचा शानदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 00:12 IST

स्टार खेळाडू राहुल चौधरीच्या नेतृत्त्वाखाली सांघिक खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करताना तेलगू टायटन्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात तामिळ थलायवास संघाला ३२-२७ असे

हैदराबाद : स्टार खेळाडू राहुल चौधरीच्या नेतृत्त्वाखाली सांघिक खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करताना तेलगू टायटन्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात तामिळ थलायवास संघाला ३२-२७ असे नमवले आणि प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात दमदार विजयी सलामी दिली. कर्णधार राहुलने पहिल्याच सामन्यात दहा गुणांची वसुली करताना वर्चस्व राखले. निलेश साळुंखेनेही आक्रमणात ७ गुण मिळवताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. येथील गचिबोवली बंदिस्त स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत तेलगू संघाने सावध सुरुवात केल्यानंतर स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत असलेल्या तामिळ संघाला सहज नमवले. राहुलने शानदार खेळ करताना आक्रमणात तामिळचे बचाव भेदण्यात यश मिळवले. त्याचसह विशाल भरद्वाजचे भक्कम संरक्षण आणि निलेश साळुंखेची आक्रमणात मिळालेली साथ या जोरावर तेलगूने आघाडी वाढवताना अखेरपर्यंत तामिळ संघाला दडपणाखाली ठेवले. विशालने बचावामध्ये ५ गुण मिळवत तामिळची चांगली पकड केली. तेलगूने तामिळ संघावर एक लोण चढवताना आक्रमणात १९, तर बचावामध्ये ११ गुणांची कमाई केली. तामिळला लोण चढवण्यात अपयश आले. त्यांनी आक्रमणात १६ गुण, तर बचावामध्ये ९ गुण मिळवले.  तत्पूर्वी, स्टार राहुल चौधरी व  निलेश साळुंखे यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर तेलगू टायटन्सने मध्यंतराला १७-११ अशी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले होते. राहुलने अपेक्षित कामगिरी करताना आक्रमणामध्ये तामिळ थलायवासला दडपणाखाली ठेवली. त्याचवेळी, दुसरीकडे निलेशनेही शानदार चढाईंचे प्रदर्शन करताना तामिळच्या आव्हानातली हवा काढली. तामिळकडून के. प्रपंजन (७), सी. अरुण (४), विनीत कुमार (३) आणि अनुभवी अजय ठाकूर (६) यांनी चांगली झुंज दिली. परंतु, राहुल - निलेश यांच्या धडाक्यापुढे त्यांचा फारसा निभाव लागला नाही.