शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी : सायली जाधवच्या अष्टपैलू खेळाने महात्मा गांधी स्पोर्ट्स उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:58 IST

सायलीने या महत्वपूर्ण लढतीत पहिल्या चढाई पासूनच आक्रमक पवित्रा घेत तब्बल २१ गुणांची कमाई करून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

मुंबई, २० डिसेंबर : राष्ट्रीय खेळाडू सायली जाधवच्या अष्टपैलू खेळामुळे महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार- नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेत चेंबूरच्या नवशक्ती क्रीडा मंडळाचा ४९-१० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. सायलीने या महत्वपूर्ण लढतीत पहिल्या चढाई पासूनच आक्रमक पवित्रा घेत तब्बल २१ गुणांची कमाई करून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. मध्यंतरालाच त्यांनी २८-४ अशी मोठी आघाडी घेतली आणि प्रतिस्पर्धी नवशक्ती संघाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. सायलीला करुणा रासम आणि स्नेहल चिंदरकर यांची मोलाची साथ लाभली. नवशक्ती तर्फे पूर्वा सकपाळ हिने थोडीफार चमक दाखविली. महिला गटाच्या आणखी एका लढतीत गोरखनाथ महिला संघाने ओम साई विरुद्ध ३३-२७ असा सहा गुणांनी विजय मिळविला. पहिल्या सत्रात ओम साई संघाने १६-१५ अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात किरण बाटे, नीलम जगताप आणि अवंतिका मालपेकर यांच्या सांघिक प्रयत्नामुळे त्यांना विजय मिळविता आला. ओम साई संघाची अंशिता तांबे-सुचिता घाग चांगल्या खेळल्या.

प्रथम श्रेणी पुरुष गटातून चेंबूरच्या साहसी क्रीडा केंद्राने पार्ले स्पोर्ट्स क्लबला ३६-१८ असे हरवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. अक्षय शिंदे आणि शुभम शिंदे यांनी चढाई – पकडीचा केलेला अप्रतिम खेळ निर्णायक ठरला. पूर्वार्धातच त्यांनी २७-१ अशी मोठी आघाडी घेतली आणि तीच अखेर निर्णायक ठरली. पार्ले स्पोर्ट्स संघाने अशोक माईव आणि ललित आचरेकर यांच्या सुंदर  खेळामुळे उत्तरार्धात जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण संघाला विजय मिळवून देण्यात तो पुरेसा ठरला नाही. याच गटातील आणखी एका लढतीत स्फूर्ती (जोगेश्वरी) संघाने शिवशंकर प्रतिष्ठानवर (घाटकोपर) ३६-२८ अशी मात केली. सुनील यादव आणि प्रतिक पवार हे या विजयाचे शिल्पकार ठरले. या लढतीचे विशेष म्हणजे शिवशंकरच्या विक्रांत नार्वेकर याने उत्तरार्धात दमदार चढाया करताना तब्बल २१ गुणांची कमाई केली पण त्याचे हे प्रयत्न अपुरे ठरले. कुमार गटातून सुभाष उत्कर्ष आणि शूर संभाजी या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुभाष उत्कर्षने पार्ले स्पोर्ट्स क्लब संघाला ३०-२३ असे नमविले तर शूर संभाजी संघाने फायटर स्पोर्ट्स क्लब संघाविरुद्ध २८-१२ असा एकतर्फी विजय मिळविला. शूर संभाजी तर्पे विकास चौरासिया आणि नविन  पैडीकलवा यांनी सुंदर खेळा केला. 

टॅग्स :Kabaddiकबड्डी