शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी गिरीश इरनाक, रिशांक देवाडीगा यांची भारतीय संघात निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 19:38 IST

या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या नामवंत देशाचे संघ सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देआपल्या निर्णायक खेळांनी या दोघांनी निवड समितीला आपली  या संघात निवड करण्यास भाग पाडले. त्यांच्या निवडीने महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. 

मुंबई : दुबई येथे दि. २२ते३० जून २०१८ या कालावधीत होणाऱ्या " मास्टर दुबई कबड्डी" स्पर्धेकरिता भारतीय हौशी कबड्डी महासंघाने आज आपला १४ जणांचा  पुरुषांचा संघ जाहीर केला. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या नामवंत देशाचे संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या गिरीश इरनाक व रिशांक देवाडीगा या दोघांची या चमूत निवड करण्यात आली आहे. 

११वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या नेतृत्वाने व आक्रमक चढायांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या या खेळाडूला प्रो-कबड्डीच्या या ६व्या हंगामात एक करोड अकरा लाख रुपयांची विक्रमी बोली लागली होती. गिरीश इरनाक याने देखील महाराष्ट्राच्या डाव्या कोपरा रक्षकांची भूमिका यशस्वी पार पाडताना धाडशी पकडी करीत महाराष्ट्राच्या या यशात मोलाची भूमिका बजावली. गेली कित्येक वर्षे भारतीय संघात महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड होत नाही अशी ओरड होती. आपल्या निर्णायक खेळांनी या दोघांनी निवड समितीला आपली  या संघात निवड करण्यास भाग पाडले. त्यांच्या निवडीने महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. 

   भारतीय संघ :-  १)गिरीश इरनाक (महाराष्ट्र), २)सुरींदर नाडा (हरियाणा), ३)संदीप नरवाल (हरियाणा), ४)मोहित चिल्लर (भारतीय रेल्वे), ५)राजू लाल चौधरी (राजस्थान), ६) सुरजित po (सेनादल), ७)दिपक हुडा (राजस्थान), ८)प्रदीप नरवाल (उत्तराखंड), ९)राहुल चौधरी (उत्तर प्रदेश), १०)रिशांक देवाडीगा (महाराष्ट्र), ११)मोनू गोयत (सेनादल), १२)रोहितकुमार (सेनादल), १३)अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), १४)मनजीत चिल्लर (भारतीय रेल्वे)राखीव :- १५)मनइंद्रसिंग (पंजाब), १६)सचिन (राजस्थान). 

टॅग्स :Kabaddiकबड्डीPro-Kabaddiप्रो-कबड्डी