शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'आधुनिक कबड्डीसाठी नवतंत्र अवगत करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 17:31 IST

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदनेचे मत

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षांपासून राज्यात होणारी महाकबड्डी लीग बंद आहे.पूर्वी दोन वर्ष ही स्पर्धा झाली.राज्य कबड्डी असोसिएशनने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लातूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा कबड्डीत जरी असला तरी मातीवरची कबड्डी मॅटवर आली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाशी नवोदित खेळाडूंनी जुळवून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून भारताची कबड्डी अधिक मजबूत होईल, असे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तथा प्रो कबड्डीस्टार खेळाडू नितीन मदने यांनी सांगितले.

 लातुरात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय मुलींच्या आंतर विद्यापीठ स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त ते लातुरात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, माती व मॅटवर बराच फरक आहे. मॅटवर जरी मातीपेक्षा जास्त स्पीड मिळत असली, तरी दुखापतीचीही शक्यता मॅटवर अधिक आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पुढे जावयाचे असल्यास मॅटच्या कौशल्याशी एकरुप होणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, मुंबईच्या तुलनेत मराठवाड्यातील खेळाडू कमी असले, तरी त्यांच्यात टॅलेन्ट आहे. केवळ प्रशिक्षकाअभावी त्यांच्या कौशल्याची वाढ खुंटते. यासह विविध स्पर्धेत अधिकाधिक भाग घेणे मराठवाड्यातील खेळाडूंसाठी गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक येथे डीवायएसपी पदावर असलेले नितीन यांनी खेळातही करिअर होत असल्याचे सांगून केवळ कबड्डीमुळेच क्लासवन आॅफिसर झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

महिलांसाठीही कबड्डी लीग खुली व्हावी...गेल्या दोन वर्षांपासून राज्यात होणारी महाकबड्डी लीग बंद आहे. पूर्वी दोन वर्ष ही स्पर्धा झाली. राज्य कबड्डी असोसिएशनने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून खेळाडूंची आर्थिक सोयही होईल आणि त्यांना व्यासपीठही मिळेल, यासह महिलांसाठी स्वतंत्र लीग राज्यात सुरू व्हावी, अशी अपेक्षाही नितीन मदने यांनी केली. यासह राज्यभरात कबड्डीचे क्लब वाढविणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Kabaddiकबड्डी