शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

बेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:51 IST

जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बेंगालचा मनिंदर सिंग आणि पटणाचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ प्रदीप नरवाल यांच्यामध्ये अपेक्षित लढाई रंगली.

चेन्नई : सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बेंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा ३५-२६ असा पराभव करुन प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बेंगाल संघाने गुणतालिकेत ३३ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून पटणा संघ १७ गुणांसह तळाला आहे. पटणाने आपल्या नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत.जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बेंगालचा मनिंदर सिंग आणि पटणाचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ प्रदीप नरवाल यांच्यामध्ये अपेक्षित लढाई रंगली. दोघांनी आपापल्या संघासाठी तुफानी चढाया करताना ‘सुपर टेन’ कामगिरी केली. मनिंदरने १० गुण, तर प्रदीपने १२ गुणांची कमाई केली. मात्र फरक राहिला तो सांघिक खेळाचा. एकीकडे पटणाचा प्रदीप एकामागून एक गुणांची वसूली करत असताना त्याला सहकारी खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.स्पर्धा इतिहासामध्ये मनिंदरने २६व्यांदा सुपर टेन कामगिरी केली, तर त्याचवेळी प्रदीपने तब्बल ४८व्यांदा असा पराक्रम केला. दुसरीकडे, मनिंदरला आपल्या सहकारी खेळाडूंकडून मोलाची साथ मिळाली. के. प्रपंजन (६) आणि रिंकू नरवाल (५) यांनीही शानदार खेळ करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. रिंकूने भक्कम पकडी करताना पायरेट्सचे आक्रमण खिळखिळे केले. मध्यंतराला बेंगालने १५-१४ अशी नाममात्र आघाडी घेतली होती. यानंतर तुफानी खेळ करत बेंगालने पटणाच्या आव्हानातली हवा काढली. प्रदीपने तुफानी खेळ केला, मात्र सांघिक खेळाचा अभाव पायरेट्सच्या पराभवास कारणीभूत ठरला.

टॅग्स :Kabaddiकबड्डी