शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! गर्लफ्रेंडला करायचं होतं इम्प्रेस, Video बनवण्यासाठी 'तो' थेट सिंहांच्या पिंजऱ्यात शिरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:06 IST

आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं.

उज्बेकिस्तानमधील पार्केंट येथील एका  प्राणीसंग्रहालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४४ वर्षीय एफ. इरिसकुलोव्हने आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं. यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागला आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, गार्ड असलेल्या इरिसकुलोव्हने रात्रीच्या शिफ्टमध्ये पहाटे ५ वाजता सिंहांच्या पिंजऱ्याचं कुलूप उघडलं. त्याला सिंहांच्या जवळ जाऊन व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता, जो तो त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवणार होता. 

सुरुवातीला पिंजऱ्यातील सिंह शांत बसले होते. त्याने 'सिम्बा' नावाच्या एका सिंहाला शांत राहण्यास सांगितलं आणि त्याच्या मानेवरून हात फिरवायला सुरुवात केली. पिंजऱ्याचं गेट उघडं राहिल्याने सिंह बाहेर आले होते. गार्डने या संपूर्ण घटनेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केलं. परंतु काही सेकंदांनंतर सिंहाने त्याच्यावर हल्ला केला. व्हिडिओमध्ये इरिसकुलोव्ह वारंवार सिंहांना 'शांत राहा, शांत राहा' असं म्हणताना ऐकायला येत आहे, परंतु सिंहांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

प्राणीसंग्रहालयातील या गार्डच्या आणि सिंहांचा आवाजही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. रिपोर्टनुसार, सिंहांनी त्याची  शिकार केली. हा व्हिडीओ अत्यंत भीषण असल्याचं म्हटलं जात आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या घटनेबाबत एक निवेदन जारी केलं आहे. ते म्हणाले की, १७ डिसेंबर रोजी ताश्कंद प्रदेशातील पार्केंट जिल्ह्यात असलेल्या 'लायन पार्क' या प्राणीसंग्रहालयातील तीन सिंह पिंजऱ्यातून बाहेर आले. या सिंहांनी ४४ वर्षीय गार्डवर हल्ला केला, गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेने प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पिंजरा उघडा राहिल्याने सिंह बाहेर आले. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. प्राणीसंग्रहालयाच्या या निर्णयावर अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काहींनी प्राणीसंग्रहालय प्रशासनावर टीका केली आहे. सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल