शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे १००% शुद्ध सोने; ऐकून आश्चर्य होईल पण हे खरे आहे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 09:46 IST

सोने हा धातू विजेचा उत्तम वाहक असल्याने मुख्यत्वे त्याचा वापर मोबाइलच्या मदरबोर्डमध्ये केला जातो. हे सोने १०० टक्के शुद्ध असते.

स्मार्टफोनची हौसच न्यारी. कुणाकुणाकडे तर दोन-दोन स्मार्टफोन असतात. प्रत्येकासाठी स्मार्टफोन अगदी सोन्यासारखा! पण कुणी सांगितले की तुमच्या फोनमध्ये १०० टक्के शुद्ध सोने आहे, तर खरे वाटेल? हो, हे खरे आहे. फोनमध्ये सोनेच काय तर चांदीही असते. मोबाइल बनविताना त्यात अनेक लहान-लहान वस्तू, सर्किट, चीप, कंडक्टर्स आदींचा वापर होतो. वीज वाहून नेण्यासाठी त्यात कंडक्टर (वाहक) वापरले जातात. सोने हा धातू विजेचा उत्तम वाहक असल्याने मुख्यत्वे त्याचा वापर मोबाइलच्या मदरबोर्डमध्ये केला जातो. हे सोने १०० टक्के शुद्ध असते.

नेमके किती सोने असते? यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार जवळपास ४१ मोबाइलमधील सोने एकत्र केल्यास ते १ ग्रॅम इतके भरेल. सोन्याइतकीच चांदीही फोनमध्ये वापरलेली असते. फोनमधील विविध कनेक्शन्स जोडण्यासाठी तांब्याचा वापर केलेला असतो. 

सोने काढता येणार काय? सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मोबाइलमधील सोने काढता आले तर, असा विचार कुणाच्याही मनात येऊ शकतो. परंतु हे सोने काढणे शक्य नाही. मोबाइलमध्ये सोने नेमके कुठे आहे, हे शोधणे सर्वात कठीण आहे. एखादा हार्डवेअर इंजिनीअरच हे करू शकेल. सोने काढणे केवळ अशक्य आहे. ते काढायला गेल्यास फायदा नव्हे नुकसान होण्याचीच शक्यता जास्त आहे.

सोन्याची किंमत किती? सोन्याच्या एकूण प्रमाणाचा विचार केला तर एका मोबाइलमध्ये ०.०३ ग्रॅम इतके सोने असते. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत अंदाजे१०० ते १५० रुपये इतकी असते. इतक्याच प्रमाणात असलेली चांदी काही रुपयांची असते.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन