शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

OMG! रागाच्या भरात १९ वर्षीय मुलीनं DNA टेस्ट केली; सत्य समोर येताच ३५ कोटी भरपाई मिळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:28 IST

स्पेन मीडियानुसार, या मुलीने तिचं नाव न सांगण्याच्या अटीवरुन सर्व घडलेला प्रकार शेअर केला आहे.

ठळक मुद्देया मुलीचा जन्म स्पेनच्या नॉर्दन रिओजा स्थित सैन मिलान डी रॉगरोने हॉस्पिटलमध्ये २००२ मध्ये झाला होता. काही कारणावरुन या मुलीचं तिच्या आई वडिलांशी भांडण झालं. रागाच्या भरात वाद DNA चाचणीपर्यंत येऊन पोहचलादोन्ही मुलींची अवस्था कमकुवत असल्याने त्यांना इन्क्यूबेटरमध्ये उपचारासाठी ठेवलं होतं.

सध्या एका अजब-गजब बातमीनं अनेकांना हैराण केले आहे. स्पेनमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीला स्वत:चा डीएनए चाचणीचा रिपोर्ट पाहून धक्का बसला आहे. गेल्या १९ वर्षापासून तिच्या आयुष्यात इतकी मोठी फसवणूक झाली हे तिच्या रिपोर्ट पाहून लक्षात आले. बेबी स्वॅपिंगची ही बातमी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. जी वाचून तुम्हीही चक्रावून जाल.

आई-वडिलांच्या भांडल्यानंतर केली DNA चाचणी

स्पेन मीडियानुसार, या मुलीने तिचं नाव न सांगण्याच्या अटीवरुन सर्व घडलेला प्रकार शेअर केला आहे. काही कारणावरुन या मुलीचं तिच्या आई वडिलांशी भांडण झालं. रागाच्या भरात वाद DNA चाचणीपर्यंत येऊन पोहचला. या DNA चाचणीनंतर मुलीला कळालं की, ती ज्यांच्यासोबत राहत आहे ते तिचे वडील नाहीत त्यानंतर मुलीने आईच्या नमुन्याचीही तपासणी केली तेव्हा आईदेखील तिची नाही हे तिला कळालं.

सहज गंमतीनं बापानं १२ वर्षीय पोराची DNA चाचणी केली; रिझल्ट पाहून चेहऱ्यावर घाम फुटला, मग...

हॉस्पिटलमध्ये केली पडताळणी  

या मुलीचा जन्म स्पेनच्या नॉर्दन रिओजा स्थित सैन मिलान डी रॉगरोने हॉस्पिटलमध्ये २००२ मध्ये झाला होता. या मुलीच्या घरचं वातावरण खूप टेन्शनमध्ये होतं. या मुलीला तिच्या आजीने सांभाळलं होतं. डीएनए चाचणी  रिपोर्ट पाहून तिने हॉस्पिटलशी संपर्क साधला त्यानंतर तिला जे काही ऐकायला मिळालं ते तर शॉकिंग होतं.

नुकसान भरपाई म्हणून ३५ कोटी मिळणार

हॉस्पिटलमधील रेकॉर्डनंतर समोर आलं की, या मुलीचा जन्म झाला होता त्याच दिवशी ५ तासांपूर्वी आणखी एका मुलीचा जन्म झाला होता. दोन्ही मुलींची अवस्था कमकुवत असल्याने त्यांना इन्क्यूबेटरमध्ये उपचारासाठी ठेवलं होतं. त्यानंतर हॉस्पिटल स्टाफच्या चुकीमुळे दोन्ही मुलींची अदलाबदल झाली. दोघीही चुकीच्या कुटुंबामध्ये वाढल्या. आता १९ वर्षांनी या प्रकरणाचा खुलासा झाल्यानं हॉस्पिटल अडचणीत सापडलं आहे. तर या मुलीला नुकसान भरपाई म्हणून ३५ कोटी रुपये देणार असल्याचं हॉस्पिटलने सांगितले.

सहज गंमतीनं बापानं १२ वर्षीय पोराची DNA चाचणी केली

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतही असाच प्रकार समोर आला होता. एका व्यक्तीनं सहज गंमत म्हणून मुलाची डीएनए(DNA) चाचणी केली. त्यानंतर जे सत्य समजलं ते ऐकून बापाला मोठा धक्काच बसला. १२ वर्षाच्या मुलाचा टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर त्या बापाला पुढे काय करायचं हे काही सुचलं नाही. आतापर्यंत मुलावर एवढा जीव लावला. प्रेमानं त्याला वाढवलं. पण गंमत म्हणून DNA चाचणी केली आणि सगळं काही धुळीस मिळालं. डीएनए चाचणीतून सगळं सत्य समोर आलं. आतापर्यंत ज्या मुलाला तो स्वत:चा मुलगा समजत होता. त्याची DNA चाचणी केली आणि सगळी पोलखोल झाली. अमेरिकेच्या उटाह निवासी कपल डोना आणि वन्नेर जॉनसनसोबत सर्वात भयंकर किस्सा घडला आहे. दोन मुलांचा बाप असलेल्या वन्नेर जॉनसन यांनी १२ वर्षीय मुलाचं सहज गंमतीनं डीएनए चाचणी केली. तेव्हा जॉनसनला समजलं की, तो त्याचा मुलगाच नाही. या कन्फ्यूजनचं कारण होतं IVF प्रक्रियेवेळी Fusionमध्ये झालेली चुक महागात पडली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल