शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

लंबूटांग ‘ऑलिम्पिक सुंदरी’ला मिळेना जोडीदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 05:23 IST

उंची वाढवण्यासाठी अनेक जण आयुष्यभर आटापिटा करत असले, तरी लिसिनासारख्या उंच लोकांना त्याचा अतिशय त्रास होतो. अगदी घरापासून ते बाहेर फिरतानाही प्रत्येक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

‘अटक मटक चवळी चटक, उंची वाढवायची तर झाडाला लटक’- ज्यांची उंची कमी आहे, अशा मुला-मुलींसाठी पूर्वी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये हा फिशपाँड हमखास टाकला जायचा... त्यांची टिंगलही उडवली जायची. बरेचसे विद्यार्थी ही टिंगल तितक्याच दिलदारपणे आणि खिलाडूपणे घ्यायचे, हे खरं असलं तरी  जे लंबूटांग आहेत त्यांचं काय?.. उंच लोकांची एवढी ‘हेटाळणी’ होत नसली, तरी बुटक्या लोकांपेक्षा उंच लोकांना नेहमीच जास्त आणि वास्तव अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांचा हा तिढा त्यांचा त्यांनाच सोडवावा लागतो. अगदी ऑलिम्पिक विजेत्यांनाही या अडचणींतून बाहेर पडता आलं नाही. त्यातील काहीजणांसाठी तर त्यांची उंची हा त्यांच्या ‘आयुष्याचाच’ प्रश्न होऊन बसला आहे.त्यातलंच एक नाव आहे, रशियन मॉडेल आणि रशियाच्या बास्केटबॉल संघाची ऑलिम्पिक ब्रांझपदक विजेती खेळाडू इकाटेरिना विक्टोरोवना लिसिना. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये लिसिनाच्या रशियन संघाने बास्केटबॉल संघाने ब्रांझपदक जिंकले होते. बास्केटबॉल सोडल्यानंतर लिसिनानंतर मॉडेलिंगकडे वळली. तिच्या नावावर दोन गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. पहिलं रेकॉर्ड आहे, ते म्हणजे जगातील ती सर्वांत उंच प्रोफेशनल महिला मॉडेल आहे. दुसरं गिनेस बुक रेकॉर्ड तिच्या नावावर २००८ मध्ये नोंदलं गेलं, ते म्हणजे सर्वांत लांब टांगा असलेली जगातली सर्वात उंच महिला म्हणून! लिसिनाच्या डाव्या पायाची लांबी आहे १३२.८ सेंटिमीटर, तर उजव्या पायाची लांबी आहे १३२.२ सेंटिमीटर! याशिवाय सर्वांत लांब पाय असलेली रशियाची ती सर्वांत उंच महिला आहे.उंची वाढवण्यासाठी अनेक जण आयुष्यभर आटापिटा करत असले, तरी लिसिनासारख्या उंच लोकांना त्याचा अतिशय त्रास होतो. अगदी घरापासून ते बाहेर फिरतानाही प्रत्येक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातून मार्ग काढताना बऱ्याचदा तडजोड करावी लागते. कारण त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं.अगदी स्वत:च्या घरात शिरतानाही त्यांनी खाली वाकून, मान खाली घालूनच आत जावं लागतं. झोपायला बिछाना पुरत नाही. टेबल, खुर्च्या, कपडे, चपला, बूट.. या साऱ्या गोष्टी अपुऱ्या पडतात. गाडीत बसायला गेलं, तर आत शिरता येत नाही, गुडघे वाकवून, मान खाली घालून अवघडल्या अवस्थेत बसावं लागतं. मार्केटमध्ये कोणतीच गोष्ट त्यांच्या मापाची मिळत नाही. त्यासाठी साऱ्या वस्तू त्यांना स्वत:च्या मापानं खास बनवून घ्याव्या लागतात. त्यासाठी खिसा मोकळा सोडावा लागतो. लिसिनाला या साऱ्या समस्यांचा अगदी लहानपणापासून सामना करावा लागला आहे.लिसिनाची खरी अडचण मात्र यापेक्षा खूपच वेगळी आणि मोठी आहे. लिसिना सध्या २९ वर्षांची आहे. तिच्या उंचीमुळे लाईफ पार्टनर मिळणं तिला अतिशय अवघड झालं आहे. लिसिना म्हणते, इतक्या वर्षांत ‘किमान लायकीचा’ एकही मुलगा मला मिळू शकला नाही. खरंतर कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जात-पात-पंथ-रंग-उंची.. असल्या गोष्टींचा संबंध येत नाही, येऊ नये.. उंचीचा तर त्यात कुठल्याच अर्थानं संबंध येत नाही, पण अशा ‘विजोड’ जोडप्यांकडे लोक उपहासानं बघतात, त्यांची टिंगलटवाळी करतात. त्यातही बायकोपेक्षा नवरा जर उंचीनं कमी असेल, तर त्यांना अधिकच उपहासाला सामोरं जावं लागतं. माझ्या उंचीचा जोडीदार मला मिळावा, यासाठी मी कधीपासून शोधात आहे. आता माझ्यापेक्षा एक फुटानं कमी उंची असलेल्या तरुणाशीही डेटिंग करायला मी तयार आहे, पण तोही योग अजून आलेला नाही..”सर्व शक्यता तपासून झाल्यावर लिसिना आता डेटिंग ॲप्सवर जोडीदाराचा शोध घेत आहे.. लिसिनाचं म्हणणं आहे, प्रत्येक मुलीला जे वाटतं, तेच मलाही वाटतं.. मला असा जोडीदार हवा आहे, ज्याचं माझ्यावर प्रेम असेल, जो माझी काळजी घेईल, मला समजून घेईल.. आर्थिकदृष्ट्याही तो ‘उत्तम’ असेल, तर सोन्याहून पिवळं! लिसिनाला असा जोडीदार मिळेल की नाही, माहीत नाही, पण त्यासाठीचे प्रयत्न ती मनापासून करते आहे. आपल्या प्रयत्नांना एक ना एक दिवस यश येईल, इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेला आणि मेहनतीला फळ येईल, यावर तिचा भरोसा आहे..मेसीनं मोडलं लिसिनाचं रेकॉर्ड!जगातील सर्वांत उंच टांगा असलेली महिला म्हणून गिनेस बुक रेकॉर्ड लिसिनाच्या नावावर असलं तरी अमेरिकेच्या टेक्सास येथील एका १९वर्षीय  टिनेजर तरुणीनं हे रेकॉर्ड अलीकडेच मोडलं आहे. तिचं नाव आहे मेसी कुरिन. तिचे पाय जवळपास दीड मीटर उंचीचे आहेत. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माहितीनुसार मेसीच्या डाव्या पायाची लांबी आहे १३५.२६७ सेंटिमीटर, तर उजव्या पायाची लांबी आहे १३४.४ सेंटिमीटर. यामुळे जगातील सर्वांत लांब टांगांची टिनेजर म्हणूनही मेसीची नोंद झाली आहे. दुसरं गिनेस रेकॉर्ड मात्र अजूनही लिसिनाच्याच नावावर आहे.