शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

अरेरे! 2 कप कॉफी पिणं कपलला पडलं चांगलंच महागात; बसला तब्बल 3 लाख 67 हजारांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 14:38 IST

कपलला कॉफी पिणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या खात्यातून साडेतीन लाखांहून अधिक रक्कम गेली आहे.

एका कपलला कॉफी पिणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या खात्यातून साडेतीन लाखांहून अधिक रक्कम गेली आहे. त्यांनी रेस्टॉरंटमध्ये फक्त दोन कप कॉफीची ऑर्डर दिली होती आणि त्याचे पैसे क्रेडिट कार्डने दिले होते. मात्र नंतर कार्डचे डिटेल्स तपासले असता कपलल धक्काच बसला. सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार, जेसी आणि ओडेल अमेरिकेतील स्टारबक्समध्ये कॉफी पिण्यासाठी गेले होते. दोन कप कॉफी प्यायल्यानंतर त्यांनी क्रेडिट कार्डने पैसे दिले.

पैसे भरून ते घरी आले. तोपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र काही वेळाने हे जोडपे खरेदीसाठी दुकानात गेले आणि बिल भरण्याची त्यांची वेळ आली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वास्तविक, त्याच्या क्रेडिट कार्डमध्ये कोणतीही शिल्लक शिल्लक नव्हती. चौकशी केली असता. त्यांना स्टारबक्समध्ये कार्डवरून 3 लाख 67 हजार रुपयांचे पेमेंट झाल्याचे निष्पन्न झाले. दोन कप कॉफीचे एवढे मोठे बिल पाहून जेसी आणि ओडेलला धक्का बसला आणि त्यांनी स्टारबक्सच्या मॅनेजरशी संपर्क साधला.

स्टारबक्सने दिलं हे उत्तर 

स्टारबक्सच्या प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार, कंपनीला या प्रकरणाची माहिती आहे आणि असा विश्वास आहे की या घटनेत मानवी चुकांचा समावेश असू शकतो. कंपनीने नंतर चेकद्वारे अतिरिक्त पैसे कपलला दिले. पण तो चेकही बाऊन्स झाल्याचे या कपलचे म्हणणे आहे. FOX23 ने या घटनेबाबत स्टारबक्सशी संपर्क साधला. प्रत्युत्तरात स्टारबक्सने सांगितले की, ग्राहकांची समस्या लवकरच दूर केली जाईल. स्टारबक्सने याला ह्यूमन एरर म्हटले आहे.

कपलचे म्हणणे आहे की, अनेक वर्षांपासून ते स्टारबक्समध्ये कॉफी पिण्यासाठी जात आहेत. साधारणपणे 700 ते 800 रुपयांचे बिल येते. मात्र त्या दिवशी साडेतीन लाखांहून अधिक रक्कम गेली. या घटनेचा त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. जेसीकडे कॉफी बिलाची पावती आहे जी त्यांनी 'जगातील दोन सर्वात महागड्या कॉफी' विकत घेतल्याचे सिद्ध करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.