शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही जगातील सर्वात महागडं आइसक्रीम खाल्लंय का? एका स्कूपची किंमत सोन्यापेक्षाही महाग, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 12:37 IST

जगातील सर्वात महागडं आइसक्रीम कोणतं असा जरा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

आइसक्रीम म्हटलं की क्वचितच असं कुणी असेल की ज्याच्या जीभेला पाणी सुटणार नाही. मग तो ऋतू कोणताही असो आइसक्रीम खाण्याची इच्छा अनेकांना आवरत नाही. आइसक्रीम हे एक असं डेजर्ट आहे की भलेभले लोक हवं त्या किमतीचं आइसक्रीम खरेदी करण्याची तयारी ठेवतात. पण जगातील सर्वात महागडं आइसक्रीम कोणतं असा जरा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. (World most expensive ice cream costs rs 60000 sold in dubai scoopi cafe)

एका अहवालानुसार दुबईतील 'स्कूपी कॅफे'मधील 'ब्लॅक डायमंड' नावाचं आइसक्रीम जगातील सर्वात महाग आइसक्रीम म्हणून ओळखलं जातं. ज्याच्या एका स्कूपची किंमत जवळपास ८४० डॉलर म्हणजेच ६२ हजार ९०० रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे सध्या २२ कॅरेट सोन्याची एका तोळ्याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. 

नेमकं या आइसक्रीममध्ये आहे तरी काय?ब्लॅक डायमंड या आइसक्रीममध्ये इटालियन टफल्स, एम्ब्रोसियल इराणी केसर आणि खाण्यायोग्य २३ कॅरेट सोन्याचा मुलामा हे जिन्नस वापरले जातात. ताज्या वेनिला बीन्सच्या सहाय्यानं हे आइसस्क्रीम तयार केलं जातं आणि तेही तुमच्या डोळ्यासमोर तयार केलं जातं. ब्लॅक डायमंड आइसक्रीम एका स्पेशल कपमध्ये दिलं जातं. या आइसक्रीमला काळ्या किंवा सुवर्ण रंगाच्या स्पेशल Versace Bowl मध्ये दिलं जातं. 

दुबईच्या ज्या कॅफेमध्ये हे महागडं आइसक्रीम दिलं जातं. तिथंच २३ कॅरेट खाण्यायोग्य सोन्यानं बनवलेली गोल्ड कॉफी देखील मिळते. 

टॅग्स :DubaiदुबईSocial Viralसोशल व्हायरल