शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
4
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
5
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
6
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
7
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
8
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
9
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
11
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
12
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
13
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
15
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
16
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
17
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
18
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
19
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
20
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!

महिलेनं सांगितले आंधळा बॉयफ्रेंड असण्याचे फायदे, त्याच्यासोबत आहे ती भलतीतच खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 13:45 IST

एका महिलेनं आंधळा बॉयफ्रेंड बनवला आणि तिनं सांगितलं की बॉयफ्रेंड आंधळा असल्याचे काय काय फायदे होतात (Benefits of Blind Boyfriend). या महिलेनं आपला एक व्हिडिओ बनवून टिकटॉकवर (Tiktok Video) पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये महिलेनं आंधळ्या बॉयफ्रेंडचे पाच मोठे फायदे सांगितले.

तरुणींना आपल्या पार्टनरकडून अनेक वेगवेगळ्या अपेक्षा असतात. बॉयफ्रेंड (Boyfriend) असो किंवा पती प्रत्येक पुरुष आपल्या पार्टनरवर (Restriction of Partner) पूर्ण लक्ष ठेवत असतो. अशात महिलांना या गोष्टींपासून मोकळं राहायचं असतं. एका महिलेनं आंधळा बॉयफ्रेंड बनवला आणि तिनं सांगितलं की बॉयफ्रेंड आंधळा असल्याचे काय काय फायदे होतात (Benefits of Blind Boyfriend). या महिलेनं आपला एक व्हिडिओ बनवून टिकटॉकवर (Tiktok Video) पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये महिलेनं आंधळ्या बॉयफ्रेंडचे पाच मोठे फायदे सांगितले.

द सनच्या वृत्तानुसार, एक महिला आपल्या आंधळ्या बॉयफ्रेंडमुळे अतिशय खूश आहे. तिचं असं म्हणणं आहे, की तो कसा दिसतो याचा काहीही फरक पडत नाही. मात्र तो आंधळा आहे याचे अनेक फायदे आहेत. निया एस्पेरांजाने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की ती आपल्या पार्टनरच्या आंधळेपणाला निगेटिव्ह नाही तर फायद्याचं का समजते. नियाने सांगितलं की तिनं हा व्हिडिओ बनवण्याआधी आपल्या पार्टनरची परवानगी घेतली आहे आणि ती दररोज आपल्या या पार्टनरसोबत व्हिडिओ बनवत असते.नियाने आपल्या व्हिडिओमधून आंधळ्या बॉयफ्रेंडचे पाच फायदे सांगितले.

पहिला फायदा - तो कधीच दुसऱ्या मुलींकडे बघत नाही.दुसरा फायदा - मी कशी दिसते याचा त्याला काहीच फरक पडत नाही आणि मला माझे केसही व्यवस्थित करावे लागत नाहीत.तिसरा फायदा - माझा बॉयफ्रेंड पाहू शकत नसल्याने त्याच्यापासून गिफ्ट लपवून ठेवण्याची गरज मला पडत नाही.चौथं कारण - त्याला कधी समजत नाही की मी त्याला माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत आहे.पाचवं कारण - सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे तिला कधीच बॅकसीट ड्रायव्हिंग करावी लागत नाही.

हा व्हिडिओ नियाने शूट करून टिकटॉकवर अपलोड केला. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, तुझा ह्यूमर अतिशय सुंदर आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, तुला असं वाटतंय का की आंधपणा एक वरदान आहे? ही अतिशय रंजक बाब आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके