शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

लाखो रुपये खर्च करुन केली हेअरस्टाईल, आरशात फायनल लुक पाहताच कोसळलं रडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 19:13 IST

परफेक्ट लूक मिळवण्यासाठी जास्त पैसे खर्च केले मात्र यानंतर जो काही रिझल्ट तिला पाहायला मिळाला त्यामुळे ती अक्षरशः रडायला लागली. कारण यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी तिचा लूक अतिशय विचित्र दिसू लागला.

काही विशेष कार्यक्रमांमध्ये जाताना आपण सुंदर तयार होऊन जावं असं सगळ्यांना वाटतं. यामुळे लोक सहसा स्वतःला करता येणाऱ्या गोष्टीही एक्सपर्टकडून करून घेण्याला प्राधान्य देतात. जेणेकरून कोणतीही कमी राहू नये आणि सगळं एकदम परफेक्ट असावं. मात्र प्रत्येकवेळी आपल्या प्लॅनिंगप्रमाणेच सगळं होईल, असं नाही.

एका टिकटॉक यूजरसोबतही असंच घडलं. तिने परफेक्ट लूक मिळवण्यासाठी जास्त पैसे खर्च केले मात्र यानंतर जो काही रिझल्ट तिला पाहायला मिळाला त्यामुळे ती अक्षरशः रडायला लागली. कारण यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी तिचा लूक अतिशय विचित्र दिसू लागला (Woman Spent 20 Thousand Rupees for Worse Hairstyle). या तरुणीने हेअरस्टाईलसाठी तब्बल २० हजार रूपये खर्च केले होते (Woman Paid 20 Thousand Rupees for Hairstyle). मात्र केसांसोबत भलतंच काही होऊन बसलं. आपलं हे दुःख तिने टिकटॉकवर शेअर केलं आहे.

आपल्यासोबत घडलेल्या या घटनेचा अनुभव महिलेनं शेअर केला. यात ती फोटोच्या माध्यमातून आपल्यासोबत घडलेल्या ब्लंडरची कथा सांगितली. तिथे आपल्या हेअरस्टाईलसाठी हेअर ड्रेसरला २० हजार रूपये दिले. इतकंच नाही तर आनंदात तिने या ब्यूटिशियनला काही टीपही दिली. मात्र घरी आल्यावर जेव्हा तिने स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. तिचे हेअरस्टाईल अतिशय वाईट झालेली होती.

महिलेनं दावा केला की सलूनमधून बाहेर येण्याआधी तिने हेअर स्टाईलची किंमत आणि स्टायलिस्टची टीप मिळून २२ हजार ५२६ रुपये खर्च केले होते. तिने आपल्या केसांमध्ये एक एक्सटेन्शन करून साथी आणि सुंदर पोनीटेल बनवण्यास सांगितलं होतं. मात्र घरी येऊन जेव्हा तिने स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा ती रडू लागली. अखेर तिला आपल्या आईची मदत घेऊन आपले केस व्यवस्थित करावे लागले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके