शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Video : मुलगी 'सैराट', झोम्बी 'झिंगाट'; दोघांनी बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 16:19 IST

जगाच्या पाठीवर सतत अशा काही घटना घडत असतात ज्यावर विश्वास ठेवणं सहजासहजी सोपं होत नाही. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे.

जगाच्या पाठीवर सतत अशा काही घटना घडत असतात ज्यावर विश्वास ठेवणं सहजासहजी सोपं होत नाही. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. येथील एका २० वर्षीय तरूणीने तिच्या झोंबी डॉलसोबत लगीनगाठ बांधली आहे. या तरूणीने दावा केला आहे की, ती या डॉलसोबत म्हणजेच बाहुलीसोबत ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. 

(Image Credit : The Girl Sun)

लग्न म्हटलं की, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. प्रत्येकाला वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरकडून त्यांना सर्व आनंद मिळाला पाहिजे. काही असेही असतात ज्याची पार्टनरकडून काही अपेक्षाच नसते. असंच हे प्रकरण म्हणावं लागेल. 

झोंबी डॉलसोबत लग्न करणाऱ्या तरूणीची नाव फेलिसिटी कॅडलेक आहे. तर झोंबी डॉलचं नाव केली आहे. कॅडलेक ही अमेरिकेतील मॅसाच्युसेट्सची राहणारी आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, कॅडलेक ही डॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि कॅडलेकने हातावर डॉलच्या नावाचा टॅटू सुद्धा काढला आहे. 

कॅडलेकने नुकतच या डॉलसोबत लग्न केलं. या लग्नाला ३५ हजार रूपये खर्च आला. तसेच या लग्नाला चार कौटुंबिक मित्र, आठ दुसऱ्या डॉल्स होत्या. फेलिसिटीने सांगितलं की, 'मी ज्या प्रकारच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं, तसंच माझं लग्न झालंय'.

कॅडलेकला ही झोंबी डॉल तिच्या वडिलांनी १३ वर्षांची असताना गिफ्ट दिली होती. तिने सांगितले की, सुरूवातीला या डॉलबाबत माझ्या मनात काही फिलिंग्स नव्हत्या. पण मी १६ वर्षांची झाले तेव्हा माझ्या मनात तिच्याविषयी प्रेमाच्या भावना वाढल्या. आधी माझे बॉयफ्रेन्ड्स होते आणि मला नेहमी वाटत होतं की, माझं त्यांच्यावर प्रेम आहे. पण मला त्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. मात्र केलीवर माझं प्रेम आहे'.

कॅडलेक पुढे सांगते की, '१६ वर्षांची असताना आमच्या रिलेशनशिपमध्ये अनेक उतार-चढाव आलेत. कारण हे चुकीचं आहे म्हणून मी वेगळे झाले होते. पण गेल्यावर्षी आम्ही पुन्हा एकत्र आलो. हे प्रेम आता कधी कमी नाही होणार. मला केलीसोबत सुरक्षित वाटतं. जेव्हा मी तिच्यासोबत असते तेव्हा मला खरा जिव्हाळा जाणवतो'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUSअमेरिका