शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार खर्च करून महिलेने केस कापले; आरशासमोर स्वत:ला पाहताच ढसाढसा रडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 18:02 IST

सोशल मीडियावर सध्या या महिलेची स्टोरी व्हायरल होत आहे. ती कुठल्या देशाची आहे त्याची माहिती नाही.

केस कापणे हा प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक भाग आहे. परंतु एका महिलेने केस कापण्यासाठी जवळपास २२ हजार रुपये खर्च केले. त्यानंतर जेव्हा तिने आरशासमोर स्वत:ला पाहिलं तेव्हा ढसाढसा रडू लागली. महिलेने केस कापण्यासाठी २०० पाऊंड म्हणजे २१ हजार ७७१ रुपये खर्च केले. परंतु तरीही तिचे केस चुकीच्या प्रकारे कापले गेले. त्यामुळे महिला नाराज झाली.

सोशल मीडियावर सध्या या महिलेची स्टोरी व्हायरल होत आहे. ती कुठल्या देशाची आहे त्याची माहिती नाही. परंतु जेव्हा या महिलेने आरशात स्वत:ला पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागले. टीकटॉक यूजर Icarlyreboot व्हिडीओ शेअर करत म्हटले की, इतके पैसे खर्च केल्यानंतर त्या सलूनवाल्याने माझ्या केसाची वाट लावली. महिला तिच्या डोक्यावरील जुने केस शोधत आहे. आम्ही सलूनच्या मॅनेजरच्या बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने बोलण्यास नकार दिल्याचं या महिलेच्या आईनं सांगितले.

व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफोर्मवर टिकटॉकवर महिलेने तिच्या डोक्यावरील छोटे केस दाखवले. त्यानंतर महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात महिला सांगत आहे की, मी सुंदर दिसण्यासाठी तब्बल २१५ पाऊंड खर्च केले परंतु हे अजिबात मला शोभत नाही. महिलेने दुखी आणि रागाच्या भरात शपथ खाल्ली की आता यापुढे कुठल्याही हेअर स्टायलिशच्या मागे जाणार नाही. मी माझ्या नव्या लूकला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय असं या महिलेने सांगितले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल