शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घरी आल्यावर पत्नी दिसायची थकलेली, नवऱ्याला आला संशय,घरात लावले सीसीटीव्ही अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 19:25 IST

जेव्हा दोघांमधील विश्वास संपतो, तेव्हा नात्याला तडा जाते आणि संसाराची घड़ी विस्कळीत होते. आज आम्ही तुम्हाला अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहणारी मेलानिया डार्नेलबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या संसारात असाच काहीसा प्रकार घडला.

नवरा-बायकोचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. संसारच्या गाडीला नवरा आणि बायको अशी दोन चाक असतात आणि दोघांनी ही गाडी सोबत खेचायची असते. परंतु या सगळ्यात विश्वास हा खूप महत्वाचा असतो. जेव्हा दोघांमधील विश्वास संपतो, तेव्हा नात्याला तडा जाते आणि संसाराची घड़ी विस्कळीत होते. आज आम्ही तुम्हाला अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे राहणारी मेलानिया डार्नेलबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या संसारात असाच काहीसा प्रकार घडला.

मेलानियाच्या नवऱ्याला खूप पूर्वीपासून तिच्यावर संशय होता. त्याच्या मनात होतं की, मी तर घरी नसतो आणि मग तरी देखील ती इतकी थकलेली का असते? तिच्याकडे मला द्यायला वेळ का नसतो? त्यामुळे त्याने पत्नीचे सत्य जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली.

पण जेव्हा मेलानियाच्या नवऱ्याने सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा तिच्या नवऱ्याला धक्काच बसला. नंतर त्याने तो व्हिडीओ यूट्यूबवर शेअरही केला. पण जे सत्य समोर आले ते समजल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही. खरंतर सकाळी उठल्यावर मेलानिया फ्रेश होण्याऐवजी ती खूप दमलेली असायची. ज्यामुळे मेलानियाच्या नवऱ्याला तिच्या या वागण्याचा संशय येऊ लागला की, ती दिवसभर घरी असं काय करत असेल की, तिला इतका थकवा जाणवतोय? परंतु असं असलं तरी, तिच्या नवऱ्याने तिला समजून घेण्याचा किंवा त्यामागील नक्की कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

उलट त्याच्या मनातील संशय आणखी वाढतच गेला. तेव्हा त्याने सीसीटीव्हीची मदत घेतली. तेव्हा त्याच्यासमोर सगळं उघड झालं. मेलानियाच्या नवऱ्याने त्याच्या बेडरूममध्ये कॅमेरा लावला आणि त्यात त्याला दिसले की, त्याची पत्नी आपल्या मुलांना सांभाळण्यात इतकी थकून जाते की, स्वत:ला  देण्यासाठी तिच्याकडे वेळच नसतो.

नवऱ्याने कॅमेऱ्यात पाहिले की, तिची तीन मुले तिला रात्रभर झोपू देत नाहीत आणि तिला सकाळी लवकर उठावे लागते. तसेच दिवसभर त्यांच्यासाठी जेवण, अंघोळ, नाष्टा, सगळं करावं लागतं. ज्यामुळे पूर्णपणे थकते. शिवाय या गोष्टी तिला एकटीने करायला लागल्यामुळे तिच्याकडे स्वत:साठी देखील वेळ नसतो.  अशा परिस्थितीत त्या नवऱ्याचे डोळे उघडले आणि आपली बायको आपला मातृधर्म किती चांगल्या प्रकारे पार पाडत आहे त्याच्या लक्षात आले. ज्यामुशळे त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन बायकोची माफी मागितली.

घर सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही. आपल्याकडे भारतात देखील अशा अनेक महिला आहेत, ज्या आपलं घर सांभाळून आपलं काम देखील सांभाळतात. त्याशिवाय मुलं झाल्यानंतर महिलांची जबाबदारी देखील वाढते. मुलं, घर आणि काम हे सगळं करताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे महिलांना केव्हा ही गृहित धरु नका, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा घरातील महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी चार प्रेमाचे शब्द बोलण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्यांचा थकवा किंवा स्ट्रेस कमी होण्यात मदत मिळेल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके