Stool Hole: प्रत्येकाच्या घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर असतं. कुणाकडे नवीन चकाचक फर्निचर असतं, तर कुणाकडे जुन्या वस्तू असतात. ज्यात खुर्ची, टेबल, सोफा, स्टूल इत्यादींचा समावेश असतो. या वस्तूंची वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर केला जातो. रोज यांचा वापर होतोच होतो. पण या वस्तूंमधील काही गोष्टींकडे अजिबात लोक लक्ष देत नाहीत किंवा त्याबाबत जाणून घेण्याचा विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही. अशीच एक बाब म्हणजे प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र का असतं? स्टूलवर तुम्ही बसले तर असालच, पण कधी याचा विचार केला नसेल. चला तर आज पाहुया यामागचं कारण...
काय आहे छिद्र देण्याचं मुख्य कारण?
प्लास्टिकचे स्टूल प्रत्येक घरांमध्ये असतातच. ते स्वस्तही मिळतात आणि महागडे सुद्धा मिळतात. पण एक बाब समान असते, ती म्हणजे त्यात छिद्र असतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे प्रेशर आणि व्हॅक्यूम पास करणं. स्टूल घरातील जास्त जागा घेत नाहीत, ते एकावर एक ठेवता येतात. जेव्हा त्यावर बसायचं असतं तेव्हा ते वेगळे केले जातात. अशात जर त्यांमध्ये छिद्र नसेल तर स्टूलवर एकावर एक ठेवल्यानं प्रेशर आणि व्हॅक्यूममुळे आपसात फसतात. ज्यामुळे त्यांना वेगळं करणं अवघड होतं. अधिक जोर लावावा लागतो. पण यात छिद्र असल्याने ते सहजपणे वेगळे करता येतात.
आणखी काही कारण
स्टूलच्या मधोमध छिद्र असण्याची आणखीही काही कारणं आहेत. तुम्ही पाहिलं असेल की, छोट्याशा प्लास्टिकच्या स्टूलवर वजनदार व्यक्ती बसली तरी स्टूल तुटक नाही. याचं कारण स्टूलच्या मधोमध देण्यात आलेलं छिद्र असतं. या छिद्रामुळे बॉडी वेट समान रूपानं विभारलं जातं आणि व्यक्ती व स्टूल सेफ राहतो. एकंदर काय तर स्टूलमध्ये दिलेल्या छिद्राची भूमिका खूप महत्वाची असते. जर प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र नसेल तर स्टूल तुटण्याचा धोका असतो. ज्यामुळे व्यक्तीलाही इजा होऊ शकते.