शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

वकील काळा कोट आणि पांढरा शर्ट का वापरतात? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 12:11 IST

तुम्ही कधी कोर्टात गेले नसाल तरी सिनेमांमधून हे पाहिलंच असेल की, वकील हे नेहमी पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाच्या कोटात दिसतात.

तुम्ही कधी कोर्टात गेले नसाल तरी सिनेमांमधून हे पाहिलंच असेल की, वकील हे नेहमी पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाच्या कोटात दिसतात. हीच त्यांची ओळख झाली आहे. पण वकिलांचा हा ड्रेस कोड ठरला कसा? किंवा ते पांढरा शर्ट आणि काळा कोटच का वापरतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. अनेकांना वाटत असेल की, ही फॅशन आहे. पण तसं नाहीये. याचं कारण जाणून घेऊ....

१३२७ मध्ये एडवर्ड तृतीयने न्यायाधिशांची वेशभूषा ठरवली होती. त्यावेळी न्यायाधिशांच्या डोक्यावर एक विग वापरला जात होता. वकीलीच्या सुरूवातीच्या काळात वकिलांना चार भागांमध्ये विभाजित करण्यात आले होते. विद्यार्थी, प्लीडर(वकिल), बेंचर आणि बॅरिस्टर अशी विभागणी करण्यात आली होती. हे सगळे न्यायाधिशांचं स्वागत करत होते.

(Image Credit : Pixabay)

त्यावेळी कोर्टात सोनेरी लाल रंगाचे कपडे आणि भुरक्या रंगाचा गाउन वापरा जात होता. त्यानंतर १६०० मध्ये वकिलांच्या वेशभूषेत बदल आला आणि १६३७ मध्ये असा प्रस्ताव ठेवला गेला की, काउन्सिल्सनी जनतेनुसारच कपडे परिधान करावे. त्यानंतर वकिलांनी लांब गाउन वापरण्यास सुरूवात केली होती. असेही मानले जाते की, त्यावेळची वेशभूषा न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तींपासून वेगळं ठरवते.

(Image Credit : Flickr)

पुढे १६९४ मध्ये ब्रिटनची राणी क्वीन मेरी यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे पती राजा विलियम्स यांनी सर्वच न्यायाधीश आणि वकिलांना सार्वजनिक रूपाने शोक व्यक्त करण्यासाठी काळे गाउन परिधान करून एकत्र येण्याचा आदेश दिला. हा आदेश कधीच रद्द केला गेला नाही. ज्यानंतर आजपर्यंत ही प्रथा चालत आली आहे की, वकील काळा कोट घालतात.

आता तर काळा कोट वकिलांची ओळख झाली आहे. अधिनियम १९६१ नुसार, कोर्टात पांढरा बॅंड टायसोबत काळा कोट घालून येणे अनिवार्य करण्यात आलं होतं. असे मानले जाते की, या काळ्या कोटमुळे आणि पांढऱ्या शर्टमुळे वकिलांमध्ये एक शिस्त येते आणि त्यांच्या न्यायाप्रति विश्वास रूजतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेadvocateवकिल