शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाला ‘केक’का कापतात, कारण माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 05:16 IST

वाढदिवसाला केक बेक करायचा, त्यावर मेणबत्त्या लावून विझवायच्या आणि मग तो कापायचा आणि सगळ्यांनी वाटून खायचा हे कुणी ठरवलं?

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार, bhalwankarb@gmail.com

वाढदिवस साजरा करायचा म्हणजे केक हवाच हवा. जगातल्या बहुतेक सगळ्या देशांत वाढदिवसाला केक कापायची आणि खायची पद्धत आहे. वाढदिवसाला केक बेक करायचा, त्यावर मेणबत्त्या लावून विझवायच्या आणि मग तो कापायचा आणि सगळ्यांनी वाटून खायचा हे कुणी ठरवलं? ऐकून गंमत वाटेल की, या केक सोहळ्यात जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतींनी आणि देशांनी भर घातली आहे. बेकिंग कसं करायचं, हे प्राचीन इजिप्शियन बल्लवाचार्यांना माहीत होतं, ते केकही बनवत. पण आजच्यासारखा लुसलुशीत नाही बरं. पुढे ग्रीसमध्ये केक बेक व्हायला सुरुवात झाली. आपल्या चंद्र देवतेच्या आराधनेसाठी ग्रीक लोक केक बनवू लागले. मंदिरात केकचा नैवेद्य दाखवताना त्यावर चंद्राच्या आकारात मेणबत्त्या लावायची पद्धतही या काळात होती. काळ पुढे गेला, पण केक या ना त्या स्वरूपात बनवण्याची पध्दत अनेक ठिकाणी होती. केक वाढदिवसाच्या दिवशी आणूयात ही कल्पना मात्र जर्मनांची. जर्मन आई-बाबा केक खायला द्यायच्या आधी बर्थडे बॉय किंवा बर्थडे गर्लला फार तंगवायचे. केकवर दिवसभर मेणबत्ती लावून ठेवायचे; पण ती विझवायचे नाहीत. उलट एक मेणबत्ती संपली की दुसरी लावायचे. मध्यरात्री केकवरची मेणबत्ती विझली की मग तो कापून खायचा, ही पद्धत होती. केकवर लावलेली मेणबत्ती आपल्या मुलाला एक वर्ष आयुष्य मिळालं, याचा आनंद व्यक्त करण्यासाठी होती. आधुनिक औषध-उपचार पध्दतीचा विकास होण्याआधी लहान मुलांचा मृत्यूदर जास्त होता, म्हणून कदाचित ही पद्धत असणार. या उत्सवाला जर्मनीत किंडरफेस्ट म्हणत. केक बनवताना लागणा-या वस्तू महाग आणि सहज न मिळणाऱ्या होत्या, त्यामुळे केक बनवणं हे श्रीमंती लक्षण होतं. औद्योगिक क्रांतिमुळे केकसाठी लागणाऱ्या वस्तूही स्वस्त झाल्या आणि घरोघरी केक बनू लागले. इंग्लंडसह युरोप आणि अमेरिकेत वाढदिवसाला केक बनू लागला. बेकिंग पावडरच्या शोधामुळे तो लुसलुशीत झाला. आज केकचे अक्षरशः शेकडो प्रकार आहेत. केकने सर्वांवर जादू केली आहे. आता केक कापताना ‘हॅपी बर्थडे टू यू’ असं का म्हणायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर साहजिकच आहे, पण ती गोष्ट पुन्हा कधी तरी.